Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Accident News : पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, 9 जण जागीच ठार; आयशर टेम्पोचा चक्काचूर

Accident News Near Narayangaon On Pune nashik Highway : पुणे नाशिक महामार्गावरील नारायणगाव जवळ एक भीषण अपघात झाला आहे. यात आयशर आणि एसटीच्या मध्ये आल्यानंतर छोटा आयशर टेम्पोचा चक्काचूर झाला आहे. या घटनेत नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि पोलिसांनी धाव घेत, जखमींना तात्काळ खासगी आणि शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देखील प्रशासनाकडून देण्यात आली.

Accident News

या बाबत मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार पुणे - नाशिक महामार्गावर जात असताना एसटीच्या मागे हा छोटा टेंम्पो जात होता. तर त्याच्या पाठीमागून आयशर गाडी प्रवास करत होती. मात्र आयशरने जोरात धडक दिल्याने छोटा टेम्पो हा बसवर जाऊन आदळला. दोन्ही गाड्यांच्यामध्ये आल्याने छोटा टेम्पो मधील प्रवासी हे गंभीर जखमी झाले आहेत.

Accident News

नेमका कसा घडला अपघात?

नारायणगाव जवळ हा अपघात शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास झाला आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स ऑटो गाडीला पाठीमागून आयशर टेम्पोने जोराची धडक दिली. चेंडू प्रमाणे ही मॅक्स ऑटो पुढे फेकली गेली. पुढं एक ब्रेक फेल झालेली एसटी रस्त्याच्या बाजूला उभी होती. त्याच एसटीवर जाऊन ही मॅक्स ऑटो आपटली. यात चार महिला, चार पुरुष आणि एका बाळाचा जागीच मृत्यू झाला आहे. इतर तिघे जखमी असल्याचे सांगितले जात आहेत.

मृतांच्या वारसांना ५ लाखांच्या मदतीची घोषणा

या अपघातानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना मदतीची घोषणा केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 'एक्स'वर याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळ झालेल्या भीषण अपघातात 9 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो. मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्यात येईल. जखमींच्या उपचाराची योग्य काळजी घ्या, असे मी पुणे पोलिस अधीक्षक यांना सांगितले आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+