अबू आझमी यांना हार्ट-अटॅक; रुग्णालयात केले दाखल, त्यांच्या कार्यालयाने सांगितले- प्रकृती स्थिर
समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे.
अबू आझमी यांना हृदय विकाराचा झटका आल्याची प्राथमिक समोर आली आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

त्यांच्या प्रकृतीबाबत त्यांच्या कार्यकर्त्याकंडून माहिती देण्यात आली आहे. "अबू आझमी यांची तब्येत बिघडली होती म्हणून त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र आता ते घरी परतले आहेत. अबू आझमी सध्या ठीक आहे", अशी माहिती अबू आझमी यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे.
मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघातून मैदानात
अबू आझमी हे महाविकास आघाडीच्या सोबत आहेत. त्यांचा मतदारसंघ हा मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघ असून ते या ठिकाणाहून सलग तीन वेळा निवडून आलेले आहेत. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत अबू आझमी यांचा प्रवास सोपा नाही. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक हे देखील मानखुर्द-शिवाजीनगर येथून निवडणूक लढत आहेत.
त्यामुळे अबू आझमी यांच्यासमोर कडवं आव्हान आहे. दरम्यान, त्यांना आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अचानक प्रकृती बिघडली होती. त्यांना त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर समर्थकांकडून सांगण्यात आले की त्यांची प्रकृती स्थिर आहे. मायनर हॉर्टअटॅक आल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली आहे.












Click it and Unblock the Notifications