दानवे सत्तारांना औरंगजेब म्हणाले; आता राष्ट्रवादीच्या नेत्याचीही वादात उडी; म्हणाले, माफी मागा नाहीत

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागल्यानंतर महाविकास आघाडी व महायुतीमध्ये अनेक जगांवरुन पेच निर्माण झाला. हा पेच काही प्रमाणात सुटला मात्र आघाडी व युतीमधील सगळेच घटक पक्ष एकमेकांना मदत करतील का, या शंका उपस्थित केल्या जावू लागल्या.

संभाजीनगर जिल्ह्यातील काही मतदारसंघात महायुतीमधील घटक पक्षांमधला वाद आता चव्हाट्यावर येऊ लागला आहे. भाजपचे नेते रावसाहेब दानवे व सिल्लोडचे शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यामध्ये कलगीतूरा रंगला असतानाच आता अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनीही या वादात उडी घेतली आहे.

Danve Abdul Sattar controversy

सत्तार यांच्या विधानानंतर सुरु झाला वाद

सिल्लोड विधानसभा मतदारसंघात ज्या पद्धतीने युतीधर्म निभावला जाईल, तशी माझी साथ असेल. सिल्लोड मतदारसंघात मला महायुतीच्या घटक पक्षांनी साथ दिली तरच मी कन्नड, फुलंब्री आणि भोकरदन मतदारसंघात त्यांना साथ देईल. सिल्लोडमध्ये महायुतीचा धर्म पाळला नाही, तर मीही महायुती धर्माविरोधात फटाके फोडेल, असा थेट इशारा अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांना दिला होता. सत्तार यांच्या या विधानानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते राबसाहेब दानवेही गप्प बसले नाहीत.

रावसाहेब दानवेंनीही दिले रोख प्रत्युत्तर

कन्नड, सिल्लोड आणि फुलंब्रीमध्ये महायुतीचा धर्म पाळला जाणार का? असा प्रश्न पत्रकारांनी दानवे यांना विचारला. शिवाय सत्तारांच्या विधानाचीही आठवण करुन दिली. त्यावर सत्तार काय बोलतात ते सोडा. औरंगजेब काय बोलतो, ते मला शिवाजीला कशाला विचारता..? असं म्हणत त्यांनी दानवे यांनी अब्दुल सत्तारांना 'औरंगजेबा'ची उपमा दिली. शिवाय स्वतःला 'शिवाजी' असेही अधोरेखित केले. अब्दुल सत्तार यांना सिल्लोडच्या लोकांवर एक छाप टाकायची आहे. पण ते या निवडणुकीत चालणार नाही. सत्तारांनी त्यांची भाषा सुधारली पाहीजे. संयमाने वागले पाहिजे. तुम्ही जनतेचा आदर करा. जर केला नाही, तर जनात तुम्हाला तुमची जागा दाखवेल, असेही रावसाहेब दानवे यांनी म्हटले होते.

अमोल मिटकरींचा दानवेंवर हल्लाबोल

दानवे-सत्तार वादात आता अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनीही उडी घेतली. अमोल मिटकरी म्हणाले की, भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तारांवर टीका करताना स्वतःची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांची केलीय.‌ इतकेच नाही तर महाराजांचा एकेरी उल्लेख केला. त्यांना आमची विनंती आहे की स्वतःची तुलना शिवाजी महाराजांशी करताना आपलं तोंड आरशात पहावं. आपण बोलताना कोणाशी तुलना करतो, याची राजकीय अक्कल तुम्हाला असली पाहिजे. मी एक शिवप्रेमी म्हणून रावसाहेब दानवे यांच्या विधानाचा जाहीर निषेध करतो. त्यांनी तत्काळ महाराष्ट्राची माफी मागावी, असंही मिटकरी यांनी स्पष्ट केलं.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+