कॅच..! बाँलचा नाही, तर दोन वर्षांच्या बाळाचा..! तिसऱ्या मजल्यावरुन पडणाऱ्या बाळाला वाचवलं
एका तेरा मजल्याच्या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडणाऱ्या दोन वर्षांच्या बाळाला वाचविणारा तरुण सध्या चर्चेत आला आहे. भावेश म्हात्रे असे या तरुणाचे नाव असून, क्रिकेटमध्ये घेतात तसा पळत जात त्यांनी या पडणाऱ्या बाळाचा कॅच घेतलाय. डोंबिवलीतील देवीचा पाडा येथील या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

नेमके काय झाले होते?
आज दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास डोंबिवलीतील देवीचापाडा येथील अनुराज हाईट्स टाँवर येथे भावेश म्हात्रे काही कामानिमित्त आला होता. या इमारतीतून तो १.४९ मिनिटांच्या सुमारास बाहेर पडला. त्याचवेळी त्याला गॅलरीतील काही महिला ओरडण्याचा आवाज आला. त्याने वरती पाहिले तर त्याच क्षणी एक दोन वर्षांचे बाळ ग्रीलला काच नसल्याने खाली पडत होते. त्याने तत्काळ आहे त्या स्थितीत, अतिशय जोरात पळत जात त्या बाळाचा कॅच घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कॅच सुटला. मात्र कॅच सुटल्यावर ते बाळ हळू खाली पडले आणि त्या बाळाचा जीव वाचला.
देव तारी त्याला...
ही घटना वाचतोय तेवढी सोप्पी नव्हती. काही मायक्रो सेकंदात हे सगळे घडले. भावेशने काहीही विचार न करता क्रिकेटच्या मैदानावर कॅच घ्यायला धावतो तसे धावत जात हे सगळे केले. वास्तविक, फक्त धावत कॅच करणे, एवढंत भावेशच्या डोक्यात होते. भावेशच्या या कृतीमुळे मात्र एका चिमुकल्याचा जीव वाचला. या बाळाच्या हाताला थोडं लागल्याचं सांगितलं जातं. मात्र भावेशने त्या बाळाचे प्राण वाचवले हे मात्र तितकंच खरं आहे. त्यामुळेच भावेशचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.
व्हिडीओ व्हायरल
भावेशच्या हा व्हिडीओ अनुराज हाईट्स सोसायटीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चित्रीत झाला. तेथूनच तो व्हायरल करण्यात आलाय. भावेशच्या या धाडसाचे सध्या चांगलेच कौतूक होताना दिसत आहे. जिवाची पर्वा न करता व चिमुरड्याला वाचविण्याचा भावेशचा प्रयत्न खरोखर कौतूकास्पद आहे. या धाडसाचे सध्या सर्वत्र कौतूक होत आहे.












Click it and Unblock the Notifications