70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा निकाल बाकी!; बावनकुळेंचा अजितदादांना इशारा
₹70,000 Crore Case Verdict Pending : राज्याच्या राजकारणात सध्या महापालिका निवडणुकांचे वारे वाहत असून, १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी महायुतीमधील मित्रपक्षांमध्येच 'कलगीतुरा' रंगला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर केलेल्या एका विधानामुळे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे चांगलेच संतापले असून, त्यांनी अजित पवारांना त्यांच्याच भाषेत सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे. "७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा निकाल अजून लागलेला नाही," अशी आठवण करून देत बावनकुळेंनी दादांना थेट इशारा दिला आहे.

वादाची ठिणगी कशी पडली?
पिंपरी-चिंचवडमधील एका जाहीर सभेत बोलताना अजित पवार यांनी भाजपच्या जुन्या आरोपांवरून खिल्ली उडवली होती. ते म्हणाले होते की, "माझ्यावर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. पण गंमत बघा, ज्यांनी माझ्यावर हे आरोप केले, आज मी त्यांच्याच सोबत सरकारमध्ये मांडीला मांडी लावून बसलो आहे." अजित पवारांच्या या 'मास्टरस्ट्रोक' विधानामुळे भाजपची काहीशी कोंडी झाली होती.
बावनकुळेंचा 'इशारा' : ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा निकाल बाकी!
अजित पवारांच्या विधानाचा समाचार घेताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी अत्यंत कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा हा काही अभिमानाने सांगण्यासारखा नाही. या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात अजूनही सुरू आहे आणि अंतिम निकाल लागलेला नाही. त्यामुळे 'क्लीन चिट' मिळाली आहे अशा थाटात बोलणे चुकीचे आहे. न्यायालयाच्या निकालानंतरच दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल."
"मागची पाने चाळली तर दादांना बोलता येणार नाही"
बावनकुळे यांनी अजित पवारांना त्यांच्या पिंपरी-चिंचवडमधील सत्तेच्या कार्यकाळाची आठवण करून दिली. ते म्हणाले, "अजित दादा हे प्रगल्भ नेते आहेत, त्यांनी एका महापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीत मनभेद निर्माण होतील असे विधान करू नये. पिंपरी-चिंचवडमध्ये ते अनेक वर्षे सत्तेत होते. जर आम्ही आता त्यांची मागची पाने उलटली किंवा जुनी प्रकरणे बाहेर काढली, तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. आमची जुनी पाने उलटण्याची इच्छा नाही, पण त्यांनी मर्यादा ओलांडू नये."
महायुतीच्या 'समन्वय समिती'च्या नियमांचे उल्लंघन?
चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीचा संदर्भ दिला. "समन्वय समितीच्या बैठकीत एकमेकांविरुद्ध जाहीरपणे न बोलण्याचे ठरले आहे. असे असतानाही अजित पवार असे विधान का करत आहेत, याची कल्पना नाही. मी त्यांना सल्ला देण्याइतका मोठा नाही, पण त्यांनी समन्वय समितीच्या नियमांचे पालन करावे," असेही बावनकुळे यांनी ठणकावून सांगितले.
राजकीय पेच: मित्र की शत्रू?
महापालिका निवडणुकांच्या तोंडावर नाशिक, अंबरनाथ आणि आता पिंपरी-चिंचवडमध्ये महायुतीतील नेत्यांमध्ये सुरू असलेली ही जुंपणी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करत आहे. एका बाजूला सत्तेसाठी एकत्र असलेले हे पक्ष स्थानिक पातळीवर एकमेकांचे 'वस्त्रहरण' करताना दिसत आहेत.
-
DA Hike सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात 5% वाढ; पगार वाढणार 'या' राज्याचा मोठा निर्णय -
पुण्यासाठी मोठी बातमी! पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट; रामवाडी-वाघोली मेट्रो कामाला गती; हा आहे फायदा -
युद्धाचा भडका! तरीही सोन्याच्या दरात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा भाव झाला 'एवढा'; पहा मुंबई पुण्याचे दर -
Gudi padwa 2026 wishes in Marathi : गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाचे खास 30 शुभेच्छा संदेश शेअर करा -
सोन्याच्या दरात मोठी घसरण! दुबईत 10 तोळे सोने भारतापेक्षा 21 हजाराने स्वस्त; मुंबई, पुण्यातही स्वस्त -
Chaitra Amavasya 2026 :18 की 19 मार्च? चैत्र अमावस्या नक्की कधी? जाणून घ्या तिथी, शुभ-मुहूर्त, महत्व -
हरीश राणांना कसा दिला जाणार 'इच्छामृत्यू'? व्हेंटीलेटर हटवणे ते अखेरच्या श्वासापर्यंत काय घडतं? वाचा -
Gudi Padwa 2026: गुढीपाडवा कधी आहे? का साजरा केला जातो हा सण? जाणून घ्या यामागील रंजक पौराणिक कथा -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
काबुल हादरले! रुग्णालयावर भीषण 'एअरस्ट्राइक'; 400 जणांचा मृत्यू, 'त्या' व्हिडिओने जग सुन्न! -
प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! महाराष्ट्रात 5 हजार पदांसाठी मेगाभरती; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा -
आजचे राशीचक्र: कुणाचे नशीब चमकणार आणि कुणाला संघर्ष करावा लागणार? वाचा आजचे राशीभविष्य










Click it and Unblock the Notifications