पुण्यात ड्रग्जपार्टी प्रकरणी 5 जण ताब्यात, पोलिस अॅक्शनमोडवर
पुणे : पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जाते. मागील काही दिवासापासून हे शहर कधी हिट अॅन्ड रनमुळे तर कधी ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत राहिलं आहे.तर आज पुण्यातील एका नामांकीत हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलं ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.त्यामुळे पुन्हा एकदा एकच खळबळ उडाली.

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आत्तापर्यंत 5 जणांना घेतलं ताब्यात असून या 5 जणांमध्ये हॉटेलचा मालक सुद्धा ताब्यात आहे. या व्यतिरिक्त याठिकाणी असलेला एक मॅनेजर आणि एक कर्मचारी सुद्धा ताब्यात घेण्यात आला आहे.
संबंधित प्रकाराचे व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरण सिंह राजपूत घटनास्थळी दाखल झाले. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्यासह गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारीदेखील घटनास्थळी पोहोचले. पुणे पोलीस तसेच गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून या संपूर्ण पार्टीचे विश्लेषण करण्यात आले. लिक्विड लीजर लाउंज L3 या हॉटेलमधील सीसीटीव्हीचे डीव्हीआर पुणे पोलिसांनी जप्त केले आहेत.
आमदार रवींद्र धंगेकर यांचे गंभीर आरोप
संबंधित प्रकार समोर आल्यानंतर काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलीस आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पुणे शहर आणि आसपासच्या भागात पहाटे तीन वाजेपर्यंत पब हे चालविले जात आहेत. या विरोधात पोलिस आयुक्त कार्यालयासमोर पब चालकांची यादी वाचून दाखविली होती. आता पुन्हा ती वेळ आणू नका, पोलिसांनी पब चालकांवर कारवाई करावी, अन्यथा पुन्हा पोलिस आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल. तसेच विभागाचे मंत्री शंभूराज देसाई हे केवळ कारवाई करु असे आश्वासन देतात. मात्र ते काही करत नसून ते कसाई सारखे वागतात, अशा शब्दांत काँग्रेस पक्षाचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांचे ड्रग्जप्रकरणावरुन गंभीर आरोप
शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी ड्रग्जप्रकरणावरुन गंभीर आरोप केले आहेत. उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह संबंधित एक्साईज अधिकारी कोट्यवधींचा हप्ता घेतल असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.
-
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!








Click it and Unblock the Notifications