Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोठी बातमी..! 'या' 5 लाख लाडक्या बहिणी अपात्र; मंत्री तटकरेंनी ट्विट करुन दिली मोठी अपडेट

महाराष्ट्रात महायुती सरकारला पुन्हा सत्तेत बसविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लाडकी बहिण योजनेबाबत आता एक मोठी बातमी समोर आली आहे. महिला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या बदललेल्या निकषांची माहिती आपल्या सोशल मिडिया अकांऊंट एक्सवर दिली. या नव्या निकषांनुसार या योजनेतून पाच लाख महिला आता अपात्र ठरणार आहेत.

Ladki Bahin Yojana

लाडकी बहिण ठरली गेमचेंजर

विधानसभा निवडणुकांआधी महायुती सरकारने लाडकी बहिण योजना जाहिर केली होती. ही योजना जुलै 2024 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेतील लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये थेट खात्यात दिले जात होते. आतापर्यंत योजनेचे सात हप्ते वितरीत करण्यात आले आहेत. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच देण्यात येणार आहे.

लाडकी बहिण योनजेवर टिका

लाडकी बहिण योजनेमुळे सरकारच्या यापुर्वीच्या अनेक योजनांवर गदा येणार असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. शिवाय शासनाच्या तिजोरीवर यामुळे मोठा आर्थिक ताण पडणार असल्याची ओरड होत होती. यासाठी इतर योजनांचा निधी कमी केला असल्याचा आरोपही झाला होता. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा या दोन योजना बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.

काय म्हणाल्या तटकरे?

आदिती तटकरे यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेतून वगळण्यात येत आहे. अपात्र ठरविण्यात आलेल्या निकषांप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या 2,30,000 महिलांना वगळण्यात आले आहे. तसेच वय वर्षे 65 पेक्षा जास्त असलेल्या 1,10,000 महिलांना योजनेतून अपात्र ठरविले गेले आहे. कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या आणि स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या 1,60,000 महिला आहेत. यानुसार एकूण पाच लाख महिला आता अपात्र ठरल्या आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+