Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहीते पाटील यांच्या पुतण्यानं दोघांना चिरडलं; एकाचा जागीच मृत्यू

पुणे: पुण्यात घडलेल्या पोर्शे कार अपघाताची घटना ताजी घटना असतानाचं आता पुन्हा एकदा पुण्यात आमदाराच्या पुतण्याने सुसाट गाडी चालवत दोघांना चिरडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेत एका 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. दुसरा तरुण गंभीर जखमी आहे.

Pune car accident

पुण्यातील खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याने हा अपघात केला असून रविवारी (ता. 23 जून) मध्यरात्री घडलेल्या या अपघातामुळे खळबळ उडाली आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील एकलहरे गावाजवळ अपघात घडल्यानंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

पोलिस तातडीनं घटनास्थळी दाखल होऊन तणावपूर्ण वातावरणाची परिस्थिती नियंत्रणात आणली.याप्रकरणी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. ओम भालेराव (वय 19वर्ष) असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचं नाव आहे. तर मयुर मोहिते असं आमदार मोहिते यांच्या पुतण्याचं नाव आहे.

आमदार दिलीप मोहिते यांचा पुतण्या मयुर हा पुणे-नाशिक महामार्गावरून कारने पुण्याच्या दिशेनं येत होता. तो विरुद्ध दिशेनं सुसाट कार चालवत होता. त्यावेळी समोरून आलेल्या दोन दुचाकीस्वारांना त्याच्या कारनं धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की दुचाकीस्वार हवेत उडाला होता. डोक्याला तसंच छातील मार लागल्यानं अपघातात ओम भालेराव या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला. अपघातानंतर मयुर हा कारमध्येच बसून होता. त्यानं कुठलीही मदत केली नाही. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+