अबब! न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेत १२२ कोटींचा घोटाळा;कुणी मारलाय हात? वाचा, संपूर्ण प्रकरण

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेत तब्बल १२२ कोटींचा घोटाळा झाला आहे. दादर पोलिस स्टेशनमध्ये बँकेच्या मुख्य लेखा अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. बँकेचे माजी व्यवस्थापक हितेश प्रवीणचंद मेहता व त्यांच्या एका साथीदाराने हा प्रकार केला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. दादर आणि गोरेगाव शाखांचे व्यवस्थापन करणाऱ्या मेहता यांच्यावर २०२० ते २०२५ दरम्यान आर्थिक फसवणूक करण्यासाठी त्यांच्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.

New India Cooperative Bank Scam

कशी फुटली वाचा?

दादर पोलिस स्टेशनमध्ये बँकेच्या मुख्य लेखा अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. मेहता यांचा एक साथीदार असल्याचा पोलिसांना संशय आहे. आता पुढील तपासासाठी हा खटला आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) वर्ग करण्यात आला आहे, असे एएनआयने पुढे म्हटले आहे. बीएनएस कलम ३१६(५) आणि ६१(२) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. प्रशासनातील त्रुटींबद्दल चिंता व्यक्त केल्यानंतर, रिझर्व्ह बँकेने (RBI) मुंबईस्थित कर्जदात्याविरुद्ध कठोर कारवाई केली आहे. गुरुवारी, मध्यवर्ती बँकेने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेला कर्ज देण्यापासून किंवा नूतनीकरण करण्यापासून, नवीन ठेवी स्वीकारण्यापासून किंवा RBI च्या पूर्व परवानगीशिवाय पेमेंट करण्यापासून रोखण्यासाठी निर्बंध लादले.

बँकेचे संचालक मंडळ बरखास्त

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आरबीआयने बँकेच्या संचालक मंडळाला १२ महिन्यांसाठी बरखास्त करण्याची घोषणा केली. स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) चे माजी मुख्य महाव्यवस्थापक श्रीकांत यांची कामकाजावर देखरेख करण्यासाठी प्रशासक म्हणून नियुक्ती केली. त्यांना मदत करण्यासाठी सल्लागारांची एक समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. एसबीआयचे माजी महाव्यवस्थापक रवींद्र सप्रा आणि चार्टर्ड अकाउंटंट अभिजीत देशमुख यांचा त्यात समावेश आहे. आरबीआयने हस्तक्षेपाचे प्राथमिक कारण "खराब प्रशासन मानके" असल्याचे सांगितले आहे.

ग्राहकांमध्ये उडाला गोंधळ

आरबीआयच्या या कृतींमुळे ग्राहकांमध्ये घबराट पसरली आहे. मुंबईतील बँकेच्या शाखांबाहेर शेकडो लोक त्यांच्या बचती आणि लॉकरबद्दलच्या चिंतेने जमा झाले होते. अनेक खातेधारकांनी पुढील आर्थिक अस्थिरतेच्या भीतीने पैसे काढण्यासाठी धावपळ केली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+