बाईsss हा काय प्रकार ? लाडकी बहिण योजनेत भावांची घुसखोरी, चक्क 12 पुरुषांनी शकक्ल लढवून भरले अर्ज
छत्रपती संभाजीनगर : सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेत असलेली 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' या सरकारी योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिलांना मिळत आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला दर महिन्याला दीड हजार रुपयांची मदत सरकारकडून दिली जात आहे. मागील काही आठवड्यांमध्ये तीन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये या योजनेअंतर्गत दोन हफ्ते म्हणजेच प्रत्येक महिलेला तीन हजार रुपये देण्यात आले आहेत. पण या योजनेचा लाभ चक्क काही पुरुष घेत असल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर मध्ये उडकीस आला आहे.
काय आहे प्रकार?
छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड तालुक्यात 12 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज भरले.त्यांनी आधारकार्डवर स्वत:च्या फोटोऐवजी महिलांचे फोटो लावून अर्ज केल्याचा केले . मात्र लाडकी बहीण योजनेअंतर्गत दाखल करण्यात आलेल्या अर्जांच्या पडताळणीचं काम सुरु असताना हा प्रकार उघडकीस आला. बालकल्याण विभागाकडून अर्ज पडताळणी केली जाते. आॅगस्ट च्या पडताळणीत हा प्रकार 30 बालकल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या समजला यानंतर एकच खळबळ माजली.

पुरुषांनी काय केली चलाखी?
कन्नडमधील 12पुरुषांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने दिलेल्या पोर्टलवर स्वत:च्या आधारकार्डाचा फोटो अपलोड केला. तसंच त्यांनी हमीपत्रामध्येही स्वत:चं नाव लिहिलं. मात्र फोटो अपलोड करताना त्यांनी महिलांचा फोटो वापरला. आपली चोरी पकडली जाणार नाही, कारण सविस्तर तपशील तपासला जाणार नाही असा त्यांना विश्वास होता. पण पडताळणी दरम्यान 12 जणांचे बिंग फुटले आता या प्रकरणी चौकशीचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
साता-यातही घडला होता प्रकार
यापूर्वी सातारा जिल्ह्यातील एका पुरुषाने तब्बल 30 महिलांच्या आधार कार्डचा वापर करुन या योजनेअंतर्गत 30 वेगवेगळे अर्ज केले होते. जेव्हा पडताळणीदरम्यान करण्यात आली तेव्हा लक्षात आले की, 30 अर्जांपैकी 26 अर्जांनाशी एकच बँक खाते सलंग्न आहे. यानंतर त्या व्यक्तीची पोलखोल झाली. यापुरुषाने लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी चक्क पनवेलमधील महिलांचे फोटो वापरले होते. त्यांनतर पनवेल तहसील कार्यालयात या विषयी तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती.
दरम्यान, अजित पवार यांनी काल एका ठिकाणी भाषण करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणा-यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. पनवेल मधील प्रकरणाचा दाखला देत ते म्हणाले होते की आम्ही देतो पण फसवणूक केली तर मग आम्ही तुरुंगात ही टाकतो असा सज्जड दमही अजित पवार यांनी भरला होता.












Click it and Unblock the Notifications