अकरावीत प्रवेश घेताय? ऑनलाईन अर्ज भरताना ही कागदपत्रे अत्यंत आवश्यक; अन्यथा प्रवेशाला येईल मोठी अडचण
11th admission required documents and certificate list in Marathi : इयत्ता अकरावीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. 21 मे रोजी होणारी प्रवेश प्रक्रिया वेबसाईटच्या समस्येमुळे 26 मे 2025 पासून सुरु झाली आहे. पहिल्या दिवशी तब्बल दोन लाख विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश अर्ज भरला होता. त्यानंतर आता ही प्रक्रिया सुरु आहे.
अकरावीसाठी प्रवेश घेताना शिक्षण विभागाने काही महत्वाच्या कागदपत्रांसाठी विशेष सूचना दिल्या आहेत. याची माहितीही माहितीपत्रकात त्यांनी दिली. त्यानुसार, जर तु्म्हाला जर फार्म भरताना कोणती कागदपत्रे हवी असेल तर ही बातमी आणि यातील यादी तुम्हाला महत्वाची ठरेल. अकरावीसाठी आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे यासह प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज कसा करावा हे आपण जाणून घेणार आहोत.

अकरावी प्रवेशासाठी 'ही' प्रमाणपत्रे आवश्यक
- 11वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने 10वी / समकक्ष परीक्षेचे मूळ गुणपत्रक आणि 10वीचा शाळा सोडल्याचा दाखला (टीसी) मूळ प्रत ही प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहेत.
- ही प्रमाणपत्र 11 वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक आहेत. त्यामध्ये खुल्या प्रवर्गातील तसेच विविध आरक्षणाच्या लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश होतो.
- या दोन प्रमाणपत्रांशिवाय विविध आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्याथ्यांना इतर काही कागदपत्रे सादर करावी लागतील. त्याचा सविस्तर तपशील खाली देण्यात आलेला आहे.
आवश्यक कागदपत्रे - (कोणत्या संवर्गासाठी लागू)
1. दहावीची गुणपत्रिका किंवा समतुल्य (सर्वांसाठी लागू राहील.)
2. दहावी सोडल्याचा दाखला (सर्वांसाठी लागू लाहील.)
3. जातीचा दाखला (सर्व अनुसूचित जाती, जमाती, व्हीजे/एनटी, ओबीसी, एसबीसी/एसईबीसी लागू)
4. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या व्यक्तींसाठी पात्रता प्रमाणपत्र (ईडब्ल्यूएस वर्गासाठी लागू)
5. नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र (व्हीजे/एनटी, ओबीसी, एसबीसी, एसईबीसीसाठी लागू)
6. सिव्हिल सर्जनचा अपंगत्व प्रमाणपत्र (दिव्यांग/अपंगांना लागू)
7. जिल्हाधिकारी प्रमाणपत्र (प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्तांना लागू)
8. पालकांचे हस्तांतरण आदेश आणि सामीलीकरण अहवाल (बदली झालेल्या कर्मचाऱ्यांचे वॉर्डसाठी लागू)
9. सेवा प्रमाणपत्र किंवा जिल्हा सैनिक मंडळाचे प्रमाणपत्र (संरक्षण सैनिक आणि माजी सैनिकांचे वॉर्डसाठी लागू)
10. जिल्हाधिकारी प्रमाणपत्र (स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांसाठी लागू)
11. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी दिलेले प्रमाणपत्र (क्रीडाक्षेत्रात प्राविण्य असलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांसाठी)
12. महिला आणि कुटुंब कल्याण विभागाने दिलेले प्रमाणपत्र (अनाथ अर्जदारांना लागू)
अकरावीला प्रवेश घेण्यासाठी 'या' तारखा समजून घ्या
- अकरावी प्रवेशासाठी नोंदणी वेळ: 26 मे ते 3 जून 2025
- तात्पुरती गुणवत्ता यादी: 5 जून सकाळी 11 वाजता जाहीर होईल.
- आक्षेप आणि दुरुस्ती आणि विनंती वेळ: 6 जून ते 7 जून
- अंतिम गुणवत्ता यादी: 8 जून सायंकाळी 4 जाहीर होणार आहे.
- कॉलेज स्तरावर अल्पसंख्याक, कोटा, इन-हाऊस कोटा, व्यवस्थापन कोट्यासाठी शून्य फेरीचा प्रवेश 9 ते 11 जून दरम्यान केला जाईल.
- गुणवत्ता यादीनुसार, वाटप झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयांची यादी : 10 जूनला सकाळी 10 वाजता जाहीर होईल. यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागणार आहे.
अकरावी प्रवेशासाठी अर्ज कसा करावा?
- सर्वप्रथम महाराष्ट्र इयत्ता 11 वी प्रवेश 2025 साठी अधिकृत वेबसाइट
- https://mahafyjcadmissions.in/ ला भेट द्या.
- होम स्क्रीनवरील नोंदणी लिंकवर क्लिक करा
- पसंतीचे महाविद्यालय निवडा
- सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि विनंती केलेली माहिती भरा
- अधिकृत पोर्टलवर गुणवत्ता यादी आणि महाविद्यालयीन वाटपाचा मागोवा घ्या.
फाॅर्म भरायला समस्या असेल तर येथे संपर्क करा
जर तुम्हाला प्रवेश प्रक्रियेत काही अडचण आली, अथवा फाॅर्म अपलोड झाला नाही किंवा तांत्रिक समस्या आल्या तर त्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने 7669100257 किंवा 18003132164 या हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. हे क्रमांक सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत सुरू राहणार आहेत.












Click it and Unblock the Notifications