निवडणुकीच्या धामधुमीत खळबळजनक बातमी; कुलाब्यात सापडला 10 कोटी डॉलर्सचा परदेशी चलनसाठा!
Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झालेली आहे. उद्यापासून प्रचाराच्या सभा सर्वत्र होणार आहे. अशातच मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. निवडणूक आयोगाकडून नेमण्यात आलेल्या भरारी पथकाने कुलाब्यामधून तब्बल 10 कोटी किमतीचे डॉलर्स सापडल्याने एकच खबळळ उडाली.
आतापर्यंत पुणे, उल्हासनगरातही कारवाई
काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर येथे पोलिसांनी 5 कोटी रुपयांची रोकड एका कारमध्ये जप्त केली होती. तर पुणे शहरात सोन्याच्या दागिन्यांची वाहतूक करणारा टेम्पोही ताब्यात घेतला होता. पालघरमध्येही 5 कोटींची रोकड आढळून आली होती. त्यानंतर उल्हासनगरमध्ये एका कारमधून 17 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

10 कोटीचे डॉलर्स सापडले
पुणे, उल्हासनगरानंतर कुलाब्यातून 10 कोटी किमतीचे डॉलर्स ताब्यात घेण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या पथकाने ही कारवाई केली आहे. मरीन ड्राईव्ह येथील बालमोहन परिसरात नाकाबंदी दरम्यान ही रक्कम आढळली आहे. मात्र ही रक्कम मर्चटांईन बँकेची असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे परदेशी चलन भारतीय चलनात रुपांतरीत करण्यासाठी घेऊन जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. कस्टम अधिकारी यांच्याकडून देखील या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. विमानतळावरुन या संदर्भात परवानगी होती का? याची ही माहिती घेतली जाणार आहे.
आतापर्यंत 187 कोटींची मालमत्ता जप्त
निवडणूक आचारसंहितेच्या काळात सजगपणे कार्यरत असलेल्या राज्यातील विविध अंमलबजावणी यंत्रणांनी 15 ते 30 ऑक्टोबर 2024 पर्यंत एकूण 187 कोटी 88 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. विविध ठिकाणी पोलीस विभाग आणि इतर यंत्रणांनी उभारलेले तपासणी नाके योग्य पध्दतीने कार्यरत असल्यामुळे हे यश मिल्याचे सांगण्यात आले आहे. राज्य पोलीस विभागाने सुमारे 75 कोटी रूपये, इन्कमटॅक्स विभागाने सुमारे 60 कोटी रूपये, राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुमारे 11 कोटी रूपये जप्त केलेले आहेत.












Click it and Unblock the Notifications