कसाई मारला, पण आता इस्त्रायलला हमासने दिली 'ही' मोठी धमकी
इस्त्रायलने हमासचा नेता याह्या सिनवार उर्फ कसाई मारला, मात्र त्यानंतर हमास जास्त चिडलं. आता यापुढचं युद्ध हे जास्त खतरनाक व आक्रमक राहील, अशी थेट धमकी हमासन दिली आहे. इस्रायलच्या लष्करानं गाझा पट्टीत एअर स्ट्राईक करत तीन दहशतवाद्यांना मारल्याचं म्हटलं आहे. त्या तीन अतिरेक्यात याह्या सिनवार होता असंही सांगितलं आहे.
...म्हणून याह्याला कसाई म्हटलं जायचं
याह्या सिनवारला अनेक नावे आहेत. कुणी हमासचा ओसामा बिन लादेन म्हणतात. तर कुणी खान युनिसचा जल्लाद. इस्रायलकडून त्याची तुलना हिटलरशी करण्यात येत होती. याह्या सिनवार इतका क्रूर होता की त्याने अनेक पॅलेस्टाईनी नागरिकांना तडफडवून मारलं आहे. त्यामुळेच त्याला कसाई असं संबोधलं जात होतं. लहान मुलांसमोर त्याने या हत्या केल्या होत्या. तसंच लहान मुलांना तो बंदुक कशी चालवायची हे शिकवत होता. त्याच्या प्रचंड क्रौर्यामुळे त्याला कसाई हे नाव पडलं.

इस्त्रायल म्हणतं, युद्ध संपलेलं नाही
7 ऑक्टोबरला जो नरसंहार झाला त्यासाठी जबाबदार असलेल्या याह्या सिनवारला आम्ही ठार केलं आहे, अशी माहिती इस्रायलचे परराष्ट्र मंत्री काट्ज यांनी म्हटल आहे. आम्ही 7 ऑक्टोबरचा हिशेब चुकता केला आहे पण अद्याप युद्ध संपलेलं नाही असंही त्यांनी जाहीर केलं आहे.
हमासनेही दिली धमकी
हमास नेता याह्या सिनवार यांच्या मृत्यूनंतर हिजबुल्लाहने इस्त्रायला थेट धमकी दिली आहे. धमकी दिल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हिजबुल्लाकडून सांगण्यात आलंय की, आता इस्त्रायलविरुद्धचं युद्ध आणखी त्वेषानं लढलं जाईल. आम्ही जास्त आक्रमकपणे सगळा सामना करु. दुसरीकडे इराणनेही आपले इरादे स्पष्ट केले आहे. याह्याला मारल्यानंतर आम्हाला नवी ऊर्जा मिळाल्याचं इस्त्रायलनं स्पष्ट केलं आहे.












Click it and Unblock the Notifications