ट्विटर पुन्हा एकदा डाउन, यूजर अस्वस्थ, 24 तासांत चौथ्यांदा आली समस्या
Elon Musk on X Outage : मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वी ट्विटर म्हणून ओळखले जाणारे) मंगळवारी (11 मार्च) पुन्हा एकदा जगभरात मोठ्या प्रमाणात बिघाडाचा सामना करत आहे. हजारो यूजर ट्विटर वापरू शकत नाहीत. गेल्या 24 तासांत X (पूर्वी ट्विटर म्हणून ओळखले जाणारे) बंद पडण्याची ही चौथी वेळ आहे.
दरम्यान काल एका दिवसातून तीन वेळा X डाऊन झालं. ज्यामुळे जगभरातील यूजर्संना समस्या निर्माण झाल्या. दरम्यान स्पेसएक्स आणि एक्सचे मालक एलोन मस्क यांनी दावा केला आहे की प्लॅटफॉर्म 'मोठ्या सायबर हल्ल्याचा' बळी ठरला आहे.
दरम्यान सोमवारी जगभरात 'X' एका दिवसात तीन वेळा डाऊन झालं. त्यामुळे X ची सेवा पूर्णपणे थांबली. त्यामुळे यूजर्संना लॉग इन करण्यात अडचणी येत होत्या. पहिल्यांदाच दुपारी 3:30 वाजता X डाऊन झाले, ज्यामुळे यूजर्संना अर्धा तास लॉग इन करण्यात अडचणी आल्या. यानंतर ते संध्याकाळी 7 वाजल्यापासून आणखी एक तास बंद राहिले आणि नंतर रात्री 8.30 वाजता पुन्हा बंद झाले.

'मोठ्या सायबर हल्ल्याचा' प्लॅटफॉर्म बळी
एलोन मस्क यांनी आता इंस्टाग्रामवर पोस्ट करत म्हटले आहे की, हा हल्ला सामान्य नव्हता, परंतु तो एखाद्या मोठ्या, संघटित गटाने किंवा अगदी एखाद्या देशानेही केला असू शकतो. त्यांनी म्हटलं आहे की, "एक्सवर मोठा सायबर हल्ला झाला (अजूनही होत आहे). आपल्यावर दररोज हल्ला होतो, पण हे खूप मोठ्या संसाधनांनी केले जात होते. एकतर एक मोठा गट किंवा एक देश यात सामील आहे. याचा शोध सुरू आहे."
डाउन डिटेक्टरवर यूजर्संच्या तक्रारी
ऑनलाइन आउटेजचा मागोवा घेणाऱ्या वेबसाइट डाउनडिटेक्टरच्या मते दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास, 2,612 यूजर्संनी X वर आपल्या समस्या नोंदवल्या आहेत. त्यानंतर संध्याकाळी 6 ते 7:30 दरम्यान पुन्हा एकदा ही समस्या जाणवली. ज्यामुळे 1,312 यूजर्सं प्रभावित झाले.
डाउनडिटेक्टरच्या मते रिपोर्टची संख्या दिवसाच्या सामान्य सरासरीपेक्षा खूपच जास्त होती. प्लॅटफॉर्मवरील काम बंद पडल्यामुळे यूजर्संना लॉगिन, पोस्टिंग आणि लोडिंग सारख्या समस्यांचा सामना करावा लागला. ही समस्या अजूनही पूर्णपणे सुटलेली नाही आणि प्लॅटफॉर्म अजूनही अस्थिर आहे.












Click it and Unblock the Notifications