तिसरे महायुद्ध सुरू झाले आहे का..याचे संकेत कसे कळणार?, अधिकृत घोषणा होते का, जाणून घ्या सर्व काही?
Iran-Israel War, US Entry and Has World War III Started? : अमेरिकेने आज रविवारी सकाळीच इराण-इस्ज्ञात्रय युद्धात उडी घेतली आणि अमेरिकेने इराणमधील तीन अणु तळांवर हवाई हल्ले करून ते उद्धवस्त केले. या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी संपूर्ण जगाला धक्काच दिला. जे ट्रम्प आम्ही युद्धात जायचे की नाही याचा पंधरा दिवसाने विचार करू असे म्हटले, तोच काही तासांमध्ये त्यांनी हा हल्ला केला.
दुसरीकडे इराणने देखील प्रत्युत्तर देत इस्त्रायलमधील 14 बड्या शहरांमध्ये 35 हून अधिक मिसाईल डागल्या. त्यामुळे आता हे युद्ध एका मोठ्या गंभीर अवस्थेत जाऊन पडले आहे. इराणचे प्रमुख खामेनी यांनीही आता अमेरिकेला इशारा दिला आहे. एकीकडे अशी परिस्थिती निर्माण झाल्याने आता तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे.
कारण, आजचे जग हे सातत्याने तणाव आणि संघर्षाच्या काळातून जात आहे. एकीकडे रशिया-युक्रेन युद्ध संपत नाहीये, तर दुसरीकडे इस्रायल आणि इराणमधील परिस्थिती वेगाने बिघडत चाललेली आहे.
अशा परिस्थितीत सामान्य लोकांच्या मनात एक प्रश्न पडतो की, तिसरे महायुद्ध सुरू झाले आहे का? याचीही अधिकृत घोषणा झाली आहे का? आणि जर झालीच तर त्याची घोषणा कशी होते, यासारख्या असंख्य प्रश्नांनी आता जगभरातील लोकांच्या डोक्यात काहूर माजवला आहे.

महायुद्धाची व्याख्या काय आहे?
महायुद्ध म्हणजे असे युद्ध ज्यामध्ये जगातील अनेक प्रमुख देश प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी होतात. आतापर्यंत मानवी इतिहासात दोन महायुद्धे झाली आहेत, पहिले महायुद्ध (1914-1918) आणि दुसरे महायुद्ध (1939-1945). दोन्ही युद्धे एकाच घटनेने सुरू झाली, परंतु हळूहळू संपूर्ण जगाला वेढून टाकले.
तिसरे महायुद्ध कोणत्यातरी व्यासपीठावरून अधिकृत घोषणा करून सुरू होईल हा गैरसमज आहे. आजच्या जगात, सायबर हल्ले, आर्थिक निर्बंध, दहशतवादी हल्ले आणि तांत्रिक शस्त्रास्त्रे वापरून गुप्तपणे युद्ध लढले जाते. त्यामुळे ते अचानक सुरू होऊ शकते आणि कधीकधी लोकांना महिन्यांनंतर कळते की ते युद्धजन्य स्थितीत राहत आहेत.
तिसऱ्या महायुद्धाचे संकेत कसे ओळखायचे?
तिसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला, रशिया विरुद्ध नाटो, चीन विरुद्ध तैवान, इराण विरुद्ध इस्रायल अशा अनेक देशांमध्ये एकाच वेळी युद्ध सुरू होईल. जेव्हा हे सर्व संघर्ष एकाच वेळी उद्भवतात. जर नाटो, क्वाड, एससीओ किंवा इतर प्रमुख लष्करी युती सक्रियपणे युद्धात उतरतात.
जर कोणत्याही देशाने अणुहल्ला केला तर हे युद्धाचे टोकाचे लक्षण असेल. बँकिंग प्रणाली, विमानतळ, उपग्रह आणि पॉवर ग्रिडवर सायबर हल्ले वाढतात.
जागतिक व्यापार थांबू लागतो, पेट्रोलियम किंवा धान्य यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडू लागतात. अशा प्रकारे, तिसरे महायुद्ध सुरू होऊ शकते.
आजची परिस्थिती किती गंभीर आहे?
सध्या जग अनेक आघाड्यांवर युद्धासारखी परिस्थितीचा सामना करत आहे. रशिया आणि युक्रेनमधील सुरू असलेले युद्ध, तैवानवर चीनची नजर, उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचण्या आणि इस्रायल आणि इराणमधील तणाव या सर्वांनी जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आणले आहे.
दुसरी बाब म्हणजे, या युद्धात फरक एवढाच फरक आहे की, यावेळी युद्ध केवळ शस्त्रांनी लढले जाणार नाही, तर डेटा, अवकाश, इंटरनेट आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातूनही लढले जाईल.
कोणताही नेता युद्धाची घोषणा करणार नाही?
सद्य परिस्थितीचा विचार केला, तर तिसऱ्या महायुद्धाची घंटा वाजणार नाही किंवा कोणताही नेता टीव्हीवर त्याची घोषणा करणार नाही. पण जेव्हा एकाच वेळी अनेक आघाड्यांवर हल्ला केला जातो.
जेव्हा जगातील देश एकमेकांवर निर्बंध लादण्यास सुरुवात करतात आणि जेव्हा तुम्ही सामान्य जीवनातून थेट आणीबाणीच्या परिस्थितीत जाता तेव्हा समजून घ्यावेच लागेल की तिसरे महायुद्धाचा शंखनाद झालेला आहे.












Click it and Unblock the Notifications