चीनमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती होणार?, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंगंची सत्ता जाणार?, पडद्यामागे नेमकं?
Xi Jinping Latest News : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्याचे कारण, म्हणजे ते यावेळी ब्रिक्स परिषदेत सहभागी झालेले नाहीत. दुसरीकडे ते जगाच्या नजरेतून गायब झाले आहेत.
परिणामी, आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत की, शी जिनपिंग कुठे आहेत आणि ते काय करत आहेत? त्यांची सत्ता धोक्यात आहे की ते काहीतरी मोठे करण्याचा विचार करत आहेत?, अशी भीती व्यक्त केली जात आहे की चीनमधील शी जिनपिंग यांची सत्ता आता संपुष्टात येणार आहे.
चीनमध्ये माध्यमांवर बंदी आहे आणि केवळ मर्यादित माहिती जगापर्यंत पोहोचते. असे नाही की जिनपिंग यांच्यावर हा धोका पहिल्यांदाच आलेला आहे, याआधी त्यांना सत्तेवरून हटवण्याचे प्रयत्न अनेक वेळा झाले आहेत. परंतु, ते त्या सर्व प्रयत्नांना फोडून काढण्यात यशस्वी झालेले आहेत.

शी-जिनपिंग सत्तेपासून दूर का जात आहेत?
दुसरी गोष्ट म्हणजे, चीनमध्ये बंद दाराआड काहीतरी मोठे घडत आहे. एकेकाळी चीनवर आयुष्यभर राज्य करण्याचे स्वप्न पाहणारे शी जिनपिंग आता स्वतःचे अधिकार कमी करण्यात गुंतल्याचे काही अहवालात समोर आले. पक्षाचा 'मुख्य नेता' म्हणून स्वतःला घोषित करणाऱ्या नेत्याने आता सत्तेतील वाटा सोडण्याच्या दिशेने पहिले पाऊल उचलले आहे. कारण काय? चीनची ढासळणारी अर्थव्यवस्था आणि आतून निर्माण होणारी अस्वस्थता.
गेल्या आठवड्यात, कम्युनिस्ट पक्षाच्या (CPC) सर्वात शक्तिशाली युनिट असलेल्या पॉलिटब्युरोची बैठक शी जिनपिंग यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या 24 सदस्यीय युनिटला अधिक अधिकार देण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही तीच युनिट आहे, ज्याची शक्ती एकेकाळी शी जिनपिंग यांनी स्वत:कडे मर्यादित केली होती.
पीएलए शी जिनपिंगच्या विरोधात आहे का?
चीनमध्ये सत्तेची ताकद चीनच्या कम्युनिस्ट पक्षाकडे म्हणजेच सीपीसीकडे आहे. याआधी शी जिनपिंग यांच्या हत्येचे 6 वेळा प्रयत्न झाले आहेत. सत्तेची चावी स्वतःकडे ठेवण्यासाठी जिनपिंग यांनी त्यांच्या अनेक विरोधकांना निर्दयीपणे चिरडून टाकल्याचे देखील बोलले जाते. आता काही अहवालांमध्ये दावा केला जात आहे की, जिनपिंग यांच्या अडचणी वाढत आहेत, ज्यांनी यापूर्वी पीएलएच्या सेनापतींचा नाश केला होता. आता त्यांना पीपल्स लिबरेशन आर्मीच्या जनरलकडूनच आव्हान दिले जात आहे.
शी जिनपिंगच्या आधीही चीनमध्ये सत्तापालटांचा इतिहास?
चीनच्या राजकीय इतिहासाबाबत विचार केला तर यापूर्वीही सत्तापालटाच्या घटना चीनमध्ये घडलेल्या आहेत. गेल्या ७० वर्षांत कम्युनिस्ट सरकारने सत्तेपासून प्रशासनापर्यंत आपली पकड कायम ठेवली आहे. 1949 मध्ये प्रजासत्ताक स्थापनेपासून चीनमध्ये कम्युनिस्ट राजवटीविरुद्ध अनेक चळवळी झाल्या आहेत. चीनमध्ये प्रजासत्ताक स्थापनेनंतर 1954 मध्ये सत्तापालटाचा प्रयत्न झाला.
त्यानंतर, चीनमध्ये दुसरी घटना 1957 मध्ये घडली, जेव्हा उजव्या विचारसरणीविरोधी चळवळ सुरू झाली. त्यानंतर, 1959 ते 1961 दरम्यान, लिऊ शाओकी यांनी माओ त्से तुंग यांच्याविरुद्ध सत्तापालट करण्याचा प्रयत्न केला. 1980 च्या दशकाच्या सुरुवातीला लोकशाही भिंत चळवळ आणि 1986 मध्ये शांघाय विद्यार्थी चळवळ झाली, परंतु कम्युनिस्ट शक्ती ती दडपण्यात यशस्वी झाली.
शी जिनपिंग यांच्याविरुद्ध वाढतोय असंतोष!
2012 पासून, शी जिनपिंग चीनमधील सत्तेच्या सर्व साधनांवर बसले आहेत. सत्ता हाती घेताच त्यांनी त्यांच्या विरोधकांना संपवण्यास सुरुवात केली. प्रथम, पीएलएच्या सर्वोच्च कमांडरना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात टाकण्यात आले.
कम्युनिस्ट चीनमध्ये लोकशाही प्रक्रियेनुसार सत्ता हस्तांतरण होत नाही. कम्युनिस्ट राजवटीत सत्तेत राहण्यासाठी, मानवाधिकार संघटनांना चिरडणे आणि निषेधाचा प्रत्येक आवाज दाबणे सामान्य झालेले आहे. शी जिनपिंग विरुद्ध लोकांचा असंतोष सतत वाढत आहे आणि पक्षापासून ते पीएलए पर्यंत त्यांच्याविरुद्ध आवाज उठवला जाऊ लागलाय. त्यामुळे आगामी काळात चीनमध्ये सत्तापालट होणार, असा दावा काही अहवालानुसार वर्तविला जात आहे.












Click it and Unblock the Notifications