Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

हज यात्रेपूर्वी सौदी अरेबियाने भारतासह 14 देशांच्या व्हिसावर तात्पुरती बंदी का घातली?, वाचा सविस्तर

Saudi Arabia Visa Ban Countries List : सौदी अरेबियाने भारत व पाकिस्तानसह 14 देशांच्या व्हिसावर बंदी घातली आहे. ही बंदी तात्पुरती आहे. पण सौदी अरेबियाने यात्रेपूर्वीच असा निर्णय घेतल्याने देशभरातील मुस्लिम बांधवांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चला तर नेमका असा निर्णय सौदी अरेबियाने का घेतला, त्याची प्रमुख कारणं कोणती, यावर नजर टाकूया..!

मिळालेल्या काही वृत्तांच्या माहितीनुसार, सौदी अधिकाऱ्यांनी सांगितले की, उमराह व्हिसा असलेले लोक 13 एप्रिलपर्यंत सौदी अरेबियात पोहोचू शकतात. यावर्षी हज यात्रा 4 जून ते 9 जून दरम्यान असणार आहे. प्रवाशांना नवीन नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. जर एखाद्या व्यक्तीने या आदेशाचे उल्लंघन केले तर त्याच्या सौदी अरेबियात प्रवेशावर पुढील पाच वर्षांसाठी बंदी घातली जाऊ शकते.

Saudi Arabia temporarily banned visas

व्हिसा रद्द करण्याच्या निर्णयाची ३ कारणे

1. बेकायदेशीर हज यात्रेकरूंना रोखणे:

अहवालात म्हटले आहे की, अनेक परदेशी नागरिक उमराह किंवा व्हिजिट व्हिसावर सौदी अरेबियात येतात. त्यांचा व्हिसाची मुदत संपल्यानंतरही ते बेकायदेशीरपणे सौदी अरेबियात राहतात. यानंतर ते नोंदणीशिवाय हज यात्रेत सहभागी होतात. हे थांबवण्यासाठी सौदी सरकारने हा निर्णय घेतला आहे. नोंदणीशिवाय हज यात्रेमुळे अधिकारी भाविकांच्या संख्येचा अंदाज लावू शकत नाहीत. गर्दी अचानक वाढते आणि उष्णताही वाढते. गर्दी नियंत्रित करण्यात अधिकाऱ्यांनाही अडचणी येतात.

2 सौदीमध्ये बेकायदेशीरपणे काम करणारे परदेशी

अधिकाऱ्यांनी सांगितले की, बेकायदेशीर काम हे देखील एक प्रमुख कारण आहे. काही परदेशी नागरिक सौदी अरेबियामध्ये व्यवसाय किंवा कौटुंबिक व्हिसाचा वापर करून बेकायदेशीरपणे काम करत होते, व्हिसा नियमांचे उल्लंघन करत होते आणि कामगार बाजारात असंतुलन निर्माण करत होते.

3. 2024 मध्ये गर्दीमुळे 1200 यात्रेकरूंचा मृत्यू

2024 मधील हज यात्रा 14 जून ते 29 जून या कालावधीत होणार होती. हज यात्रेदरम्यान मोठ्या संख्येने यात्रेकरूंचे आगमन झाल्यामुळे उष्णतेचा प्रभाव वाढला होता. यामुळे, किमान 1200 यात्रेकरूंचा मृत्यू झाला. यामध्ये 98 भारतीयांचाही समावेश होता.

भारताचा हज यात्रेकरुंचा कोटा किती आहे?

सौदी अरेबियामध्ये हजसाठी एक कोटा प्रणाली आहे, ज्या अंतर्गत प्रत्येक देशातील ठराविक संख्येतील हज यात्रेकरूंना प्रवास करण्याची परवानगी आहे. इंडोनेशियामध्ये सर्वाधिक कोटा आहे. यानंतर पाकिस्तान, भारत, बांगलादेश आणि नायजेरियाचा क्रमांक लागतो. इराण, तुर्की, इजिप्त, इथिओपियासह अनेक देशांमधून भाविक येतात. भारत आणि सौदीने 2025 साठी हज करारावर स्वाक्षरी केली.

यामध्ये हजसाठी १,७५,०२५ भाविकांचा कोटा निश्चित करण्यात आला. यामध्ये ७०% वाटा केंद्रीय हज समितीला आणि ३०% वाटा खाजगी टूर एजंटना देण्यात आला आहे. भारतात हज २०२५ साठी ऑनलाइन नोंदणी १३ ऑगस्ट २०२४ ते ९ सप्टेंबर २०२४ पर्यंत केली जाईल. गेल्या वर्षी १,७५,००० भारतीय हज यात्रेसाठी मक्का येथे पोहोचले होते. गर्दी आणि उष्णतेमुळे ९८ यात्रेकरूंचा मृत्यू झाला. उमरा व्हिसाची शेवटची तारीख १३ एप्रिल 2025 आहे.

हा निर्णय हजशी संबंधित असल्याचा दावा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सौदीचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांनी अधिकाऱ्यांना व्हिसा प्रक्रिया आणखी कडक करण्याचे निर्देश दिले आहेत. सौदीच्या हज आणि उमराह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, हे पाऊल कोणत्याही राजनैतिक वादाशी संबंधित नाही, परंतु हज यात्रेचे सुरक्षित आणि चांगल्या पद्धतीने आयोजन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+