Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

असीम मुनीर पाकचे लष्करप्रमुख नव्हे ते सीईओ, करतात हा व्यवसाय, PAK सरकार का त्यांच्याविरोधात?

Asim Munir Latest Marathi News : पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराच्या वतीने मोठी कारवाई केली जाणार त्या दिशेने पाऊले देखील उचलली जात आहे. अशातच पाकिस्तानच्या सैन्यात मोठे बदल पाहायला मिळत आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर बेपत्ता झाले अन् देशाबाहेर पळून गेल्याची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यातच पाकिस्तान सरकार आणि लष्कर प्रमुखांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे सांगितले जात आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आयएसआय प्रमुखांना देशाचे नवे NSA बनवले आहे. या घटनानंतर असीम मुनीर

आयएसआय प्रमुख बनले NSA

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांची उलट गिनती सुरू झाली आहे. त्याचे असे झाले की, शाहबाज शरीफ सरकारने रात्री उशिरा गुप्तचर संस्था आयएसआयचे प्रमुख लेफ्टनंट जनरल मुहम्मद असीम मलिक यांची पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केली. जनरल असीम मुनीरसाठी हा एक धक्का मानला जात आहे.

CEO

जनरल मुनीर बेपत्ता?

पहलगाम हल्ल्यानंतर, पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल सय्यद असीम मुनीर देश सोडून पळून गेले आहेत का?, कारण सोशल मीडियावर तशा बातम्या काल रात्रीपासून सुरू आहेत. सोशल मीडियावर मुनीरच्या हॅशटॅग्ज आणि मीम्सचा पूर आला आहे. भारताच्या कठोर उपाययोजन अन् उचललेल्या पावलांमुळे जनरल मुनीर वेगळी कोणतीही कृती करताना दिसत नाही. कोणतीही तयारी त्यांच्याकडून सुरू नाही. पाकिस्तानी लष्करप्रमुख आपल्या कुटुंबासह देश सोडून पळून गेले किंवा रावळपिंडीतील बंकरमध्ये लपले आहेत, अशी चर्चा आता सोशल मीडियावर होऊ लागली आहे. #MunirOut असा ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला आहे.

देशसेवेऐवजी घर भरण्याचे काम करतात जनरल?

असीम मुनीर हे नाव भारतात आधीच कुप्रसिद्ध आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ते अधिक पुढे आले. असीम मुनीर हे पाकिस्तानचे नाममात्र लष्करप्रमुख आहेत, तर त्यांचा दर्जा एखाद्या कंपनीच्या सीईओसारखा आहे. कारण, लष्कर हा पाकिस्तानमधील सर्वात मोठा व्यावसायिक गट आहे. पाकिस्तानी सैन्य देशभरात 100 हून अधिक व्यवसाय चालवते आणि यातून लष्करप्रमुख आणि अधिकाऱ्यांना मोठे उत्पन्न मिळते. पाकिस्तानच्या रिअल इस्टेट क्षेत्रात लष्कराचे वर्चस्व आहे. पाकिस्तानातील प्रत्येक लष्करप्रमुख पदावर असताना देशाची सेवा करण्याऐवजी स्वतःची तिजोरी भरतो. माजी लष्करप्रमुख कमर बाजवा यांच्यासह अनेक लष्करी प्रमुख याची जिवंत उदाहरणे आहेत. जनरल असीम मुनीर देखील त्याच मार्गावर चालत आहेत. त्यामुळे सरकार आणि त्यांच्यात आता वाद निर्माण होऊ लागल्याची चर्चा आहे.

पाकिस्तानी सैन्य कोणत्या प्रकारचा व्यवसाय करते?

प्रसिद्ध लेखिका आयशा सिद्दिका यांचे "मिलिटरी इंक: इनसाइड पाकिस्तान्स मिलिटरी इकॉनॉमी" हे पुस्तक पाकिस्तानी सैन्याच्या व्यावसायिक साम्राज्याबद्दल सविस्तर माहिती देते. पाकिस्तानी सैन्य सिमेंट, खत, बँकिंग, दुग्धव्यवसाय, वाहतूक आणि गृहनिर्माण यासह अनेक व्यवसाय करते. पण सर्वात मोठा व्यवसाय म्हणजे रिअल इस्टेटचा. राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली जमीन बळकावल्याबद्दल पाकिस्तानी लष्करावर बऱ्याच काळापासून टीका होत आहे. या जमिनी कराची, लाहोर आणि इस्लामाबादमध्ये व्यावसायिक गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये रूपांतरित करण्यात आल्या.

पाक लष्कराच्याव्यावसायिक साम्राज्याचे मुल्य किती

आयेशा सिद्दीकीच्या अहवालानुसार, 2007 मध्ये पाकिस्तानी लष्कराच्या व्यावसायिक उपक्रमांचे एकूण मूल्य 20 अब्ज अमेरिकन डॉलर्स होते. पण आता, ते 40-100 अब्ज डॉलर्स दरम्यान असू शकते, असा दावा केला जात आहे. यामध्ये कराची, लाहोर, इस्लामाबाद आणि इतर शहरांमध्ये पसरलेले डिफेन्स हाऊसिंग अथॉरिटीचे रिअल इस्टेट प्रकल्प समाविष्ट आहेत आणि डीएचए ही लष्कराची अब्ज डॉलर्सची मालमत्ता मानली जाते.

असीम मुनीरची एकूण संपत्ती किती?

X वरील एका पाकिस्तानी वापरकर्त्याने जनरल असीम मुनीर यांची एकूण संपत्ती $800000 (6,77,54,636 कोटी रुपये) असल्याचे उद्धृत केले. असीम मुनीर यांच्या आधी लष्करप्रमुख असलेले जनरल कमर जावेद बाजवा निवृत्त झाले तेव्हा त्यांच्या कुटुंबाची पाकिस्तानाबाहेरील एकूण संपत्ती सुमारे 13 अब्ज पाकिस्तानी रुपयांपर्यंत पोहोचली. तर, 2018 मध्ये जेव्हा ते जनरल झाले तेव्हा ही मालमत्ता शून्य होती. अशा परिस्थितीत असीम मुनीरच्या अघोषित संपत्तीचा अंदाज लावता येतो.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+