बांगलादेशात भगवान विष्णूंच्या मूर्ती वारंवार का सापडत आहेत?, जाणून घ्या त्यामागील कारणं अन् इतिहास
भारतात ज्या ज्या ठिकाणी खोदकाम झाली, त्या ठिकाणी देवाच्या मूर्त्या सापडल्याचे आपण नेहमीच ऐकत असतो. परंतु, बांगलादेशात देखील आता तसाच काहीसा प्रकार समोर येऊ लागला आहे. त्याचे झाले असे की, बांगलादेशातील दिनाजपूर येथील एका तलावातून भगवान विष्णूंची तब्बल 27 किलो वजनाची प्राचीन मूर्ती सापडली आहे. विशेष बाब म्हणजे मागील काही वर्षांमध्ये बांगलादेशात देखील वारंवार विष्णू मूर्ती सापडत आहेत. त्याचे नेमकं कारण काय, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
काही माध्यमांच्या अहवालानुसार, बांगलादेशमधील दिनाजपूर शहरातील एका तलावाचे खोदकाम सुरू आहे. या खोदकामाध्ये भगवान विष्णूंची मूर्ती सापडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दुसरीकडे जिल्ह्याभरात उत्सुकतेचे वातावरण देखील निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशमध्ये जमिनीखालून भगवान विष्णूंची मूर्ती सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. मागील चार वर्षांमध्ये देशाच्या विविध भागांमध्ये भगवान विष्णूंच्या मूर्ती सापडल्या आहेत.
बांगलादेशातील प्रसिद्ध वृत्तपत्र प्रथम ओलो यांच्यानुसार, दिनाजपूरच्या नवाबगंज भागात एका तलावाचे खोदकाम सुरू होते. यावेळी, भगवान विष्णूची 29 इंच आणि 13 इंच रुंदीची मूर्ती बाहेर आली. मूर्ती सापडल्यानंतर त्याला बघण्यासाठी एकच गर्दी त्या ठिकाणी पाहायला मिळाली.
सापडलेल्या मूर्तीचे वजन किती?
अहवालानुसार, विष्णूच्या या मूर्तीचे वजन 27 किलो आहे. भगवान विष्णूसोबतच, देवी लक्ष्मीची प्रतिमा देखील मूर्तीमध्ये कोरलेली आहे. विशेष म्हणजे, बुलडोझरने खोदकाम करूनही, पुतळ्याचा कोणताही भाग तुटला नाही.
स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, सापडलेली मूर्ती जप्त करून प्रशासनाकडून ती कोषागारात ठेवण्यात आलेली आहे. येथून ही मूर्ती पुरातत्व विभागाकडे पाठवली जाईल. पुरातत्व विभाग मूर्तीची तपासणी करेल, जेणेकरून ही मूर्ती कधी निर्माण झाली होती. साधारण कोणत्या काळात ती निर्माण केली गेली असावी याचा अंदाज पुरातत्व विभाग लावणार आहे.
दोन वर्षांपूर्वी देखील सापडली होती मूर्ती?
मिळालेल्या माहितीनुसार, 2023 च्या सुरुवातीला बांगलादेशातील फरीदपूरमध्ये भगवान विष्णूची 32 किलो वजनाची मूर्ती सापडली होती. त्याचबरोबर ऑगस्ट 2021 मध्ये, बांगलादेशमध्ये भगवान विष्णूची 1000 वर्ष जुनी मूर्ती सापडली होती.
वारंवार का सापडत आहेत भगवान विष्णूंच्या मूर्ती?
मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशात ज्या ठिकाणी भगवान विष्णूची मूर्ती सापडली, तिथे एक राजवाडा आहे. या राजवाड्यात काही वर्षांपूर्वी एक हिंदू राजा राहत होता, जो भगवान विष्णूचा भक्त होता, असे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. तो राजवाडा कालांतराने तलावाखाली दबला गेला असावा.
1947 पूर्वी बांगलादेश होता भारताचा भाग
1947 पूर्वी बांगलादेश भारताचा भाग होता. 1847 ते 1971 पर्यंत हा प्रांत पाकिस्तानच्या अधिपत्याखाली होता. 1971 मध्ये बांगलादेशला वेगळे राष्ट्र म्हणून मान्यता मिळाली. पूर्वी बंगाली हिंदू कुटुंबातील लोक बांगलादेशात राहत होते. जे भगवान विष्णूंचे भक्त होते. त्यांची लोकसंख्या कमी होत गेली, तसतसे तेथील मंदिरे नष्ट झाली आणि देवांच्या मूर्ती जमिनीखाली गेल्या. आता जमिनीखाली उत्खनन केले जात असल्याने या ठिकाणी मूर्ती सापडत असाव्यात असे सांगितले जात आहे.












Click it and Unblock the Notifications