Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कोण होणार बांगलादेशचा पंतप्रधान? मोहम्मद युनूस की खालीदा झिया? शेख हसीना नातवांसोबत वेळ घालवणार

मुंबई - बांगलादेशातील हिंसाचारानंतर पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता शेख हसीना या भारतात आहेत. त्या दुसऱ्या देशात जाऊ शकतात, हे असतानाच आता बांगलादेशात पंतप्रधान कोण होणार अशी चर्चा आहे. नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस की,खालीदा झिया हे लवकरच समजणार आहे. दरम्यान आता शेख हसीना राजकारणात पुन्हा येणार नाही हे संकेत आहेत.

बांगलादेशात गेल्या दोन महिन्यांपासून आरक्षणविरोधी आंदोलन सुरु आहे. यानंतर आंदोलकांचा मोठा दबाव आल्याने शेख हसीना यांना पंतप्रधान पदावरुन पायउतार व्हावं लागलं. त्यांनी कालच राजीनामा दिला असून त्या आता सध्या भारतात आल्या आहेत.

Bangladesh Violence Khaleda Zia Sheikh Hasina Latest Update in Marathi

काल त्यांनी भारतीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याशी एक तास चर्चाही केली. त्यानंतर आता त्या लंडनला जाण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, त्यांच्या आगामी राजकीय भविष्याबाबत त्यांचा मुलगा जाॅय यांनी वक्तव्य केलं असून त्यानुसार त्या आता सक्रीय राजकारणातून निवृत्त होतील असे संकेत आहेत.

शेख हसीना नातवांसोबत वेळ घालवणार -जाॅय

शेख हसीना यांचा मुलगा जॉय यांनी एनडीटीव्हीला सांगितले की, माझ्या आईने काहीही चुकीचे केलेले नाही. आईने देशाला सर्वोत्तम सरकार दिले आहे. आता ती राजकारणाचा निरोप घेतला आहे. आता ती आपल्या नातवंडांसोबत वेळ घालवणार आहे. जाॅय हे अमेरिकेत राहतात.

हंगामी सरकार चालवणार

देशातील सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेल्या शेख हसीना यांची सत्ता सोमवारी कोसळली. त्यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी देश चालवण्यासाठी अंतरिम सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. जुलैच्या मध्यात सुरू झालेल्या अलीकडील अशांततेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामध्ये 400 हून अधिक लोक मरण पावले आहेत.

बंग भवनचे सहाय्यक प्रेस सचिव मुहम्मद शिप्लू जमान यांनी स्वाक्षरी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, लष्कर, नौदल, हवाई दलाचे प्रमुख, विविध राजकीय पक्षांचे नेते आणि प्रमुखांशी सद्यस्थितीवर चर्चा केल्यानंतर बंगा भवन येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

खालीदा झिया यांच्या सुटकेचे आदेश

अनेक खटल्यांमध्ये दोषी ठरल्यानंतर नजरकैदेत असलेल्या बीएनपीच्या अध्यक्षा आणि माजी पंतप्रधान खालिदा झिया यांची सुटका करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. सोमवारी दुपारी शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर गंभीरपणे बिघडलेली तोडफोड थांबवणे आणि कायद्याची अंमलबजावणी सुनिश्चित करण्याचे काम लष्कराला देण्यात आले आहे. अध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांनीही सध्या सुरू असलेल्या आरक्षण सुधारणा आंदोलनादरम्यान अटक करण्यात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांची सुटका करण्यास मान्यता दिली आहे.

मोहम्मद युनूस हंगामी पंतप्रधान होऊ शकतात

मोहम्मद युनूस बांगलादेशचे हंगामी पंतप्रधान होऊ शकतात. आरक्षणविरोधी आंदोलनाचे समन्वयक नाहिद इस्लाम यांनी मंगळवारी सकाळी सांगितले की, नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकारची रूपरेषा तयार केली जाईल. युनूसने बांगलादेशमध्ये ग्रामीण बँकेची स्थापना केली. त्यांच्या गरीबीविरोधी मोहिमेसाठी त्यांना 2006 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे.

खालीदा झिया पंतप्रधान होतील का?

नॅशनेलिस्ट पक्ष (बीएनपी) च्या अध्यक्षा खालीदा झिया यांच्या सुटकेचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे त्या पंतप्रधान होऊ शकतात ही शक्यता व्यक्त होत आहे. झिया यांनी 1991 मध्ये बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनून इतिहास रचला होता.

पाकिस्तानच्या बेनझीर भुट्टो यांच्यानंतर जगातील दुसऱ्या मुस्लिम महिला पंतप्रधान बनल्या. 2001 ते 2006 पर्यंत त्यांनी आणखी एक टर्म पंतप्रधान म्हणून काम केले. त्या शेख हसीनांच्या कट्टर प्रतिस्पर्धी आहेत, खालिदा झिया यांना 2018 मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली 17 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याची सुटका बांगलादेशच्या संकटकाात महत्त्वपूर्ण राजकीय बदल ठरु शकतो.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+