Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कोण होते अगस्टिन एस्कोबार? Siemens CEO हेलिकॉप्टर अपघातात ठार, दुर्घटनेचा व्हिडिओ आला समोर!

Who was Agustin Escobar Siemens CEO : न्युयार्कमध्ये हडसन नदीत 11 एप्रिल 2025 आज गुरुवारी हेलिकॉप्टर अपघात झाला. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. या मृतात स्पेनमधील सीमेन्सचे अध्यक्ष आणि सीईओ अगस्टिन एस्कोबार आणि त्यांच्या कुटुंबातील पाच जणांचा समावेश आहे.

प्राप्त माहितीनुसार, मृतांमध्ये अगस्टीन एस्कोबार यांच्यासह त्यांची पत्नी मर्से कॅम्परुबी मॉन्टल आणि 4 ते 5 वर्षांची तीन मुले तसेच पायलट अशा सहा जणांचा समावेश आहे असे प्राथमिक वृत्त आहे. हे कुटुंब, बार्सिलोना येथील त्यांच्या घरापासून प्रेक्षणीय स्थळी सहलीला गेले होते, न्यूयॉर्क हेलिकॉप्टर टूर्सद्वारे संचालित बेल 206 हेलिकॉप्टरमध्ये ते होते.

Who was Agustin Escobar Siemens CEO

कसा आणि कधी झाला अपघात

जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिजवरून उड्डाण केल्यानंतर दुपारी 3 वाजून 3 मिनिटांनी काही क्षणांतच लोअर मॅनहॅटनजवळील नदीत हेलिकाॅप्टर कोसळले. न्यूयॉर्क शहर अग्निशमन विभागाला दुपारी 3:15 च्या सुमारास ही बातमी समजली. दरम्यान हेलिकॉप्टर हडसन नदीत बुडताना दिसले. दरम्यान, या अपघातात सर्व सहाजणांचा मृत्यू झाला. स्थानिक महापौर एरिक ॲडम्स यांनी स्पष्ट केले की, हेलिकाॅप्टरमधील सर्व सहा लोकांचा मृत्यू झाला यासंदर्भात वनइंडिया हिंदीने वृत्त दिले आहे.

(हेलिकाॅप्टर दुर्घटनेचा व्हिडिओ Evil Te𝕏an या एक्स अकाऊंटवरुन घेतला आहे.)

अगस्टिन एस्कोबार कोण होते?

  • अगस्टिन एस्कोबार हे जागतिक अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान उद्योगांमध्ये प्रसिद्ध होते.
  • अगस्टिन एस्कोबार यांनी युनिव्हर्सिडॅड पॉन्टिफिशिया कोमिला येथे इलेक्ट्रिकल इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. त्यांनी नंतर व्यवसाय शिक्षण घेतले.
  • 2002 मध्ये Universidad de Alcalá मधून MBA आणि 2005 मध्ये IE बिझनेस स्कूलमधून एक्झिक्युटिव्ह MBA त्यांनी पुर्ण केले होते.
  • अगस्टिन एस्कोबार यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार 1998 मध्ये स्पेनमधील पॉवर ऑटोमेशन सिस्टम्ससाठी विक्री आणि प्रकल्प व्यवस्थापन प्रमुख म्हणून सीमेन्समध्ये सामील झाले.
  • पुढील 27 वर्षांमध्ये, त्याने विविध व्यावसायिक युनिट्सचे नेतृत्व करत अनेक पुरस्कारप्राप्त उपक्रमांमध्ये योगदान दिले.
  • संपूर्ण दक्षिण-पश्चिम युरोपमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यातही त्यांचा सहभाग होता.
  • 2010 मध्ये, एस्कोबार उत्तर अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय व्यवसाय विकासावर देखरेख करण्यासाठी न्यूयॉर्क शहरात स्थलांतरित झाले. नंतर तो बोगोटा, कोलंबिया येथे गेला, जिथे त्याने 1,300 पेक्षा जास्त कर्मचारी आणि तीन उत्पादन संयंत्रे व्यवस्थापित केली.
  • 2016 मध्ये, त्यांनी नेतृत्व करत असलेल्या युनिटला जागतिक स्तरावर सीमेन्सचा सर्वोत्तम कामगिरी करणारा व्यवसाय म्हणून ओळखले गेले.
  • सीमेन्स रेल ऑटोमेशन SAU आणि Siemens Mobility SLU चे CEO म्हणून काम करण्यासाठी ते 2018 मध्ये स्पेनला परतले, 1,000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रकल्पांचे त्यांनी नेतृत्व केले होते.
  • 2019 आणि 2024 दरम्यान, त्यांनी दक्षिण-पश्चिम युरोप क्षेत्रामध्ये सीमेन्स मोबिलिटीसाठी CEO ची भूमिका सांभाळली, स्पेन, फ्रान्स, पोर्तुगाल, इटली, नेदरलँड्स, बेल्जियम, ग्रीस आणि आफ्रिकेच्या काही भागांसह 3,000 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या देशांमधील ऑपरेशन्सची देखरेख केली.

डोनाल्ड ट्रम्प यांनी दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला

अगस्टिन एस्कोबार यांच्या हेलिकाॅप्टर दुर्घटनेबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला शोक व्यक्त केला आहे. "हडसन नदीत भयानक हेलिकॉप्टर अपघात.. असे दिसते की पायलट, दोन प्रौढ आणि तीन मुले हे सहा लोक आता आपल्यात नाहीत. अपघाताचे फुटेज भयावह आहे. नेमके काय आणि कसे घडले ते लवकरच जाहीर केले जाईल." असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रम्प यांनी पोस्ट केली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+