Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Ramaswamy Net Worth: ट्रम्प सरकारमध्ये रामास्वामींना महत्वाचं पद,कोण आहे हा भारतीय, संपत्ती किती ?

Vivek Ramaswamy Net Worth: डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. ते 20 जानेवारी 2025 ला अध्यक्षपदाची शपथ घेतील. त्यापूर्वी त्यांनी आपली टीम तयार केलीय. डोनाल्ड ट्रम्प यांनी टेस्ला प्रमुख एलोन मस्क आणि उद्योजक विवेक रामास्वामी यांना मोठ्या पदांवर नियुक्त केले. या दोघांवरही मोठ्या जबाबदाऱ्या सोपवल्या.

मस्क आणि रामास्वामी हे दोघेही डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सी चे नेतृत्व करतील. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली. त्यानंतर रामास्वामी हा भारतीय उद्योजक कोण व त्याची संपत्ती किती याच्या चर्चा सुरु झाल्या.

Ramaswamy Net Worth

डोनाल्ड ट्र्म्प यांनी सोपवली जबाबदारी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड यांनी रामास्वामी व एलन मस्कर या दोघांवर काय जबाबदारी दिलीय, याची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली. ते म्हणाले की, "अमेरिकन देशभक्त विवेक रामास्वामी व इलॉन मस्क, 'सेव्ह अमेरिका मूव्हमेंट'साठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या सरकारी कार्यक्षमतेचा विभाग सांभाळतील. माझ्या प्रशासनात नोकरशाही दूर करणे, खर्च कमी करणे, अनावश्यक नियम काढून टाकणे तसेच फेडरल एजन्सींमध्ये सुधारणा करणे ही कामे हे दोघेही सांभाळतील. त्यातून पैशांची उधळपट्टी कमी होईल, असा विश्वासही ट्रम्प यांनी व्यक्त केला.

नेमके कोण आहेत विवेक रामास्वामी?

विवेक रामास्वामी हे मूळ भारतीय वंशाचे आहेत. ते अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे नेते आहेत. अध्यक्षपदाची शपथ घेणारे डोनाल्ड ट्रम्पही याच पक्षाचे नेते आहेत. विवेक रामास्वामी यांचं वय सध्या 38 वर्षे आहे. त्यांचा जन्म अमेरिकेच्या ओहियामध्ये झाला असून, त्यांचे आई-वडील हे भारतातून तेथे स्थलांतरित झालेले आहेत. विवेक यांनी हार्वर्ड विद्यापीठातून जीवशास्त्रात पदवी घेतली. त्यानंतर येल लॉ स्कूलमधून शिक्षण पूर्ण केलं.

एक यशस्वी उद्योजक आहेत रामास्वामी

अमेरिकेतला एक यशस्वी उद्योजक म्हणून विवेक रामास्वामी यांना ओळखले जाते. पदवी घेण्यापूर्वीच रामास्वामी यांनी हेज फंड गुंतवणूकदार म्हणून लाखो डॉलर्स कमावले आहेत. 2014 मध्ये विवेक रामास्वामी यांनी स्वतःची बायोटेक कंपनी सुरु केली. त्यांनी 2021 मध्ये कंपनीच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला. याच कंपनीचे ते 2023 पर्यंत अध्यक्ष राहिले आहेत. रामास्वामी हे स्ट्राइव्ह अॅसेट मॅनेजमेंटचे सह-संस्थापक देखील आहेत.

विवेक रामास्वामी यांची एकूण संपत्ती किती?

मीडिया रिपोर्टनुसार विवेक रामास्वामी यांची एकूण संपत्ती जवळपास 950 मिलियन डॉलर्स आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम 7 हजार 484 कोटी रुपये आहेत. अमेरिकेतील 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या श्रीमंतांमध्ये विवेक रामास्वामी यांची गणना हो

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+