Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कोण आहे दहशतवादी मसूद अजहर? ज्याच्या कुटुंबाचा Operation Sindoorमध्ये झाला खात्मा! म्हणाला मी मेलो..

Who is terrorist Masood Azhar whose family was killed in Operation Sindoo : "मी मेलो असतो तर बरं झालं असतं..!" असं वक्तव्य आलं आहे, मसूद अजहरचे. मसूद अजहरच्या परिवारातील 10 जणांचा मृत्यू झाला असे मिडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

पहलगाम हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले. यामध्ये जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबाच्या तळांचा समावेश आहे. यासह मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबने जिथे प्रशिक्षण घेतले ते स्थळही भारतीय सैन्यांनी नष्ट केले.

Who is terrorist Masood Azhar

यादरम्यान एक मोठे वृत्त आले की, हिज्बूल मुजाहिदीनचा म्होरक्या आणि भारताचा दुष्मन दहशतवादी मसूद अजहरच्या परिवारातील 10 जणांचा मृत्यू झाला. यामुळे आता भारतात दहशतवादी कारवाया करणाऱ्या मसुद अजहरच्या कृत्यांना उजाळा मिळत आहे. कंदहार विमान अपहरणात सुटलेला हा मसुद अजहर कोण हे आपण जाणून घेऊया.

कोण आहे मौलाना मसूद अजहर?

  • मोहम्मद मसूद अझहर अल्वी हा भारताचा दुष्मन आणि खतरनाक दहशतवादी आहे.
  • मसूद अझहरचा जन्म पाकिस्तानातील पंजाबमध्ये बहावलपूर येथे 10 जुलै 1968 ला झाला तर काहीजण त्याच्या जन्माची तारीख 7 ऑगस्ट सांगतात.
  • पाकिस्तान -आधारित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा मसूद अझहर हा संस्थापक आणि नेता आहे , जो प्रामुख्याने काश्मीर प्रदेशाच्या पाकिस्तान-प्रशासित भागात सक्रिय आहे .
  • 1 मे 2019 रोजी, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे.

भारतात बेकायदेशीर प्रवेश अन् अटक

1994 च्या सुरुवातीला, मसूद अझहरने खोटी ओळख दाखवत श्रीनगरमध्ये शिरकाव केला आणि प्रवासही केला. हरकत-उल-अन्सारच्या हरकत-उल-जिहाद अल-इस्लामी आणि हरकत-उल-मुजाहिदीन या गटांमधील तणाव कमी करण्यासाठी तो आला होता. भारताने फेब्रुवारीमध्ये त्याला अनंतनागजवळील खानाबल येथून अटक केली आणि या गटांसोबतच्या त्याच्या दहशतवादी कारवायांसाठी तुरुंगात टाकले होते.

राॅकेट लाँचरने उत्तर देण्याची होती भाषा

अटक झाल्यावर दहशतवादी मसूद अझहरने "काश्मीर मुक्त करण्यासाठी बारा देशांमधून इस्लामचे सैनिक आले आहेत. आम्ही तुमच्या कार्बाइनला रॉकेट लाँचरने उत्तर देऊ " असे म्हटल्याचे विकिपीडियाने म्हटले आहे, त्याला श्रीनगरमधील बदामी बाग छावणी , दिल्लीतील तिहार तुरुंग आणि शेवटी जम्मूमधील कोट बलवाल तुरुंगात टाकण्यात आले होते.

कसा सुटला मसूद अझहर?

मसूद अझहर आणि कंदहार विमान अपहरणचा मोठा संबंध आहे. जेव्हा त्याला अटक झाली त्यानंतर डिसेंबर 1999 मध्ये, नेपाळमधील काठमांडूहून नवी दिल्लीला जाणाऱ्या इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाईट 814 (IC814) चे दहशतवाद्यांनी अपहरण करण्यात आले आणि अनेक ठिकाणी उड्डाण केल्यानंतर ते अफगाणिस्तानातील कंदहार येथे उतरवण्यात आले होते . त्यावेळी कंदहारवर तालिबानचे नियंत्रण होते आणि पाकिस्तानच्या ISI चाही पाठिंबा होता. अपहरणकर्त्यांना सोडण्याच्या बदल्यात दहशदवाद्यांची सुटका करण्याची मागणी करणाऱ्या तीन अतिरेक्यांपैकी मसूद अझहर हा एक होता. त्याला त्यावेळी सोडण्यात आले होते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+