कोण आहे स्टीफन मिलर, अमेरिकेत बेकायदेशीर राहणाऱ्यांना बाहेर काढण्यामागे त्यांचा डाव काय?
Who is Stephen Miller : अमेरिकेने बुधवारी त्यांच्या नवीन इमिग्रेशन धोरणाअंतर्गत 104 बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना जबरदस्तीने हाकलून लावले. त्यांना घेऊन जाणारे अमेरिकन हवाई दलाचे विमान सी-17 ग्लोबमास्टर दुपारी 2 वाजता अमृतसर येथील हवाई दलाच्या तळावर उतरले.
यामध्ये पंजाबमधील 30, हरियाणा आणि गुजरातमधील प्रत्येकी 33 जणांचा समावेश होता. त्यांच्या काही कुटुंबांचा आणि 8-10 वर्षे वयोगटातील मुलांचाही देखील समावेश आहे.
अमृतसर विमानतळाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांच्या मते, या लोकांची पडताळणी करण्यात आली. येथून, इमिग्रेशन आणि कस्टम्सकडून मंजुरी मिळाल्यानंतर, त्यांना पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सुमारे साडेतीन तासांनंतर अमेरिकन हवाई दलाचे विमान परत आले. त्यानंतर पंजाबमधून हद्दपार केलेल्या लोकांना पोलिसांच्या वाहनांमधून त्यांच्या घरी पाठवण्यात आले. तथापि, हरियाणा, गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि चंदीगडमधील लोक अद्याप परतलेले नाहीत.
दुसरीकडे, डोनाल्ड ट्रम्प हे सत्तेत आल्यानंतर त्यांनी स्थलांतरीतांच्या मुद्द्यावरुन पहिले पाऊल उचलले आहे. अवैध राहणाऱ्यांना ते त्यांच्या मायदेशी हाकलून लावत आहेत. त्यांच्या या महत्त्वाच्या निर्णयामागे त्यांच्या सरकारमधील एक प्रमुख चेहरा कारणीभूत आहे.
त्यांचे नाव आहे स्टीफन मिलर, अशा परिस्थितीत प्रश्न उद्भवतो की ट्रम्प बेकायदेशीर स्थलांतरितांबद्दल इतके आक्रमक का आहेत? या रणनीतीमागे कोण आहे आणि अमेरिकेत ही एक मोठी समस्या का आहे? चला तर जाणून घ्या.

व्हाईट हाऊसमध्ये मोठा दर्जा?
मिळालेल्या माहितीनुसार, मिलरला व्हाईट हाऊसमध्ये मोठा दर्जा आहे. ते आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि धोरण व्यवहार विभागाचे उपसंचालक आहेत. ट्रम्प यांनी कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी केली तेव्हा मिलर देखील उपस्थित होते. या क्रमाने ट्रम्प यांनी जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करणे आणि मेक्सिकन सीमा कडक करणे यासह अनेक निर्णय घेतले होते.
निवडणूक प्रचारात दिले होते लोकांना आश्वासन
राष्ट्राध्यक्ष होताच डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. निवडणूक प्रचारादरम्यानही ट्रम्प यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांचा मुद्दा उपस्थित केला होता आणि म्हटले होते की हे लोक अमेरिकेला उद्ध्वस्त करत आहेत. आता ते अमेरिकन विमानांद्वारे बेकायदेशीर लोकांना ओळखत आहेत आणि त्यांना त्यांच्या देशात पाठवत आहेत. यामध्ये 104 बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांचाही समावेश आहे.
बीबीसीच्या वृत्तानुसार, ट्रम्पच्या या धोरणामागील सूत्रधार स्टीफन मिलर आहे. 39 वर्षीय मिलर हे कट्टर रूढीवादी रिपब्लिकन आहेत. ट्रम्पच्या पहिल्या कार्यकाळात मिलर यांनीच अनेक कडक नियम बनवले होते. यामध्ये स्थलांतरित कुटुंबांना वेगळे करणे देखील समाविष्ट होते.
स्टीफन मिलर कोण आहे?
काही वृत्तांच्या माहितीनुसार, मिलरला व्हाईट हाऊसमध्ये मोठा दर्जा आहे. ते आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि धोरण व्यवहार विभागाचे उपसंचालक आहेत. ट्रम्प यांनी कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी केली तेव्हा मिलर देखील उपस्थित होते. या क्रमाने ट्रम्प यांनी जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करणे आणि मेक्सिकन सीमा कडक करणे यासह अनेक निर्णय घेतले होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्टीफन मिलरचे लग्न केटी वॉल्डमनशी झाले आहे, जी माजी उपराष्ट्रपती माइक पेन्सची प्रेस सेक्रेटरी होती. एका ज्यू कुटुंबात जन्मलेल्या मिलरने लहानपणापासूनच राजकारणात प्रवेश केला. वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी त्यांच्या शाळेत देशभक्तीच्या अभावावर टीका केली.
मिलर हा ट्रम्पचा विश्वासू
मिलर 2009 पासून बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्ध आवाज उठवत आहेत. तो ट्रम्पचा विश्वासू मानला जातो. 2016 मध्ये तो ट्रम्प यांच्या जवळ आले. पॉलिटिकोच्या अहवालानुसार, ट्रम्प त्यांच्या भाषणांमध्ये बेकायदेशीर स्थलांतरित आणि मुस्लिमांबद्दल दाखवत असलेल्या कठोरतेमागे मिलर यांचेच धोरण मानले जात आहे. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात, स्टीफन मिलर यांनी त्यांची भाषणे लिहिण्यात आणि कठोर इमिग्रेशन धोरणे तयार करण्यात सक्रिय सहभाग घेतला होता.












Click it and Unblock the Notifications