Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

वंशभेदाचा फटका, टिकली लावण्यावरुन ट्रोल! अमेरिकेत सॉलिसिटर बनलेल्या मथुरा श्रीधरन कोण आहेत? वाचा

Who is Mathura Sridharan : जगात भारतीय जिथे तिथे आपले महत्व अधोरेखित करतात आणि भारताचे नावही कमावतात. भारतीय वंशाचे लोक तर विविध देशांत शिर्ष स्थानावर आहेत, त्यात ऋषी सुनक आणि कमला हॅरीस यांची नावे सर्वात आधी घ्यावी लागेल. कारण या दोघांनी ब्रिटन आणि अमेरिकेसारख्या विकसीत राष्ट्रांच्या सर्वोच्च पदावर हे पोहचले आताही एक मोठी बातमी आली आहे. भारतीय वंशाच्या आणखी एका महिलेने अमेरिकेत तिच्या क्षमतेचा झेंडा फडकवला आहे.

भारतीय वंशाच्या वकील मथुरा श्रीधरन यांची अमेरिकेत सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ३१ जुलै रोजी, ओहायोचे अ‍ॅटर्नी जनरल डेव्ह योस्ट यांनी मथुरा यांना राज्याचे सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती केली आहे. पण ही बाब काही अमेरिकन लोकांच्या मनात सलत आहे. सोशल मीडियावर मथुरा श्रीधरन वंशवादी आणि अपमानास्पद टिप्पण्यांना बळी पडल्या आहेत.

Who is Mathura Sridharan

Take a Poll

बिंदी लावण्यावरुन ट्रोल

मथुरा श्रीधरन यांना बिंदी लावण्याबद्दल ट्रोल करण्यात आले. त्या श्रीधरन भारतीय असल्याने आणि बिंदी घालण्याबद्दल वंशवादी ट्रोलिंगचा सामना करावा लागला. एका कमेंटमध्ये विचारण्यात आले की, "तुम्ही अशा एखाद्या व्यक्तीला का निवडाल जो अमेरिकन नाही अशा व्यक्तीला इतक्या महत्त्वाच्या पदासाठी का निवडाल?" दुसऱ्याने त्यांच्या बिंदीवर कमेंट केली की, "बिंदी अस्पष्ट आहे, परंतु तरीही ती शेवटी दिसतेय."

रंग समस्या देत असेल तर..

यावर मथुरा श्रीधरन यांच्या बचावात अ‍ॅटर्नी जनरल योस्ट उतरले आहेत, या टिप्पण्यांनंतर डेव्ह योस्ट यांनी म्हटले आणि स्पष्ट केले की मथुरा अमेरिकन नाही असा दावा करणे "चुकीचे" आहे. योस्ट यांनी जोर देऊन सांगितले की जर श्रीधरनचा रंग किंवा तिचे नाव एखाद्याला त्रास देत असेल तर समस्या त्या व्यक्तीमध्ये आहे, श्रीधरनमध्ये नाही. योस्ट म्हणाले, "काही टीकाकारांनी चुकीचा दावा केला आहे की मथुरा अमेरिकन नाही. त्या अमेरिकेच्या नागरिक आहेत. अमेरिकन नागरिकाशी लग्न केले आहे आणि नैसर्गिकरित्या अमेरिकन नागरिकांचे मूल आहे. जर त्यांचे नाव किंवा तिचा रंग तुम्हाला त्रास देत असेल तर समस्या तिच्या किंवा तिच्या नियुक्तीत नाही."

कोण आहे मथुरा श्रीधरन?

मथुरा श्रीधरन सध्या ओहायो अ‍ॅटर्नी जनरल कार्यालयात डेप्युटी सॉलिसिटर जनरल म्हणून काम करत आहेत.
प्रतिष्ठित मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) मधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कॉम्प्युटर सायन्समध्ये बॅचलर ऑफ सायन्स पदवी मिळवली आणि २००८ मध्ये अर्थशास्त्राचाही अभ्यास केला.
मथुरा श्रीधरन यांनी एमआयटीमधून त्याच विषयात मास्टर्स केले आहे.

मथुरा श्रीधरन यांचे कुठे शिक्षण झाले?

  • २०१५ मध्ये, श्रीधरन यांनी न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लॉमधून कायद्याचा अभ्यास सुरू केला आणि २०१८ मध्ये पदवी प्राप्त केली.
  • ओहायो सॉलिसिटर ऑफिसमध्ये सामील होण्यापूर्वी, त्यांनी यूएस कोर्ट ऑफ अपील फॉर द सेकंड सर्किटचे न्यायाधीश स्टीवन जे. मेनाशी आणि न्यू यॉर्कच्या दक्षिणी जिल्ह्यासाठी यूएस डिस्ट्रिक्ट कोर्टाचे न्यायाधीश डेबोरा ए. बॅट्स यांच्याकडे क्लर्क म्हणून काम केले.
  • मथुरा श्रीधरन यांच्या कारकिर्दीत त्यांनी ओहायोच्या दहाव्या सुधारणा केंद्राच्या संचालक म्हणूनही दोन वर्षांहून अधिक काळ काम केले.
  • यामध्ये "बेकायदेशीर संघीय धोरणांपासून ओहायोवासीयांचे रक्षण करण्यासाठी आणि संघीय आणि राज्य सरकारांमधील अधिकारांचे पृथक्करण जपण्यासाठी" खटले सुरू केले आणि त्यांचे निर्देश दिले.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+