ऋषि सुनक यांना पराभूत करणारे किर स्टार्मर कोण आहेत?
एक्झिट पोलने मांडलेल्या अंदाजाप्रमाणे ब्रिटनमध्ये सत्तांतर घडून आले आहे. जनमताच्या कलानुसार लेबर पार्टीचे कीर स्टार्मर हे ब्रिटनचे नवीन पंतप्रधान होतील. ऋषी सुनक यांच्या कंजर्वेटिव पार्टीचा या निवडणुकीत दणदणीत पराभव झाला.
सकाळी १० वाजेपर्यंत किर स्टार्मर यांच्या मजूर पक्षाने ३८१ जागा जिंकल्या आहेत. पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाला फक्त ९२ जागांवर आत्तापर्यंत समाधान मानावे लागले आहे. आत्तापर्यंत एकूण ६५० जागांपैकी ५१५ जागांचा निकाल हाती आला आहे.

ब्रिटेनमध्ये गेल्या १४ वर्षांपासून हुजूर पक्षाची म्हणजे भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांची सत्ता होती. यावेळी त्यांच्या विरोधात मजूर पक्ष होता. तेथील सत्ता ही या दोन पक्षांपैकी एकाकडे असते. त्यातही हुजूर पक्षाला सत्तेत राहण्याची सर्वाधिक संधी ब्रिटनच्या जनतेने दिली आहे. सध्या हुजूर पक्षाचे नेतृत्व सुनक यांच्याकडे, तर मजूर पक्षाची धुरा एप्रिल २०२० पासून स्टार्मर यांच्याकडे आहे. स्टार्मर यांनी या निवडणुकीत यश मिळवून सुनक यांच्या पक्षाला पायउतार केले.
कोण आहेत कीर स्टार्मर
कीर स्टार्मर यांचा जन्म 2 सप्टेंबर 1962 रोजी ब्रिटनमध्ये झाला. पूर्व इंग्लंडच्या सरी येथे ऑक्सटेड नावाच्या एका छोट्या शहरात ते लहानाचे मोठे झाले. त्यांचे वडील एका कारखान्यात काम करायचे. आई रुग्णालयात नर्स होती.
स्टार्मर यांच्या आईला एक दुर्मिळ आजार होता. त्यामुळे बालपणी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ब्रिटीश संसदेत ते वर्ष 2020 पासून विरोधी पक्षाचे आणि लेबर पार्टीचे नेते आहेत. 2015 ते 2024 पर्यंत होलबोर्न आणि सेंट पॅनक्रास येथून खासदार झाले.
काय म्हणाले ऋषि सुनक
ब्रिटनमध्ये भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा पराभव झाला. हा पराभव स्विकारताना ऋषी सुनक यांनी जनादेशाचा आदर केला आहे. जनतेने विचारपूर्वक निर्णय घेतला असावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
मी नुकसानीची संपूर्ण जबाबदारी घेतो आणि ब्रिटीश लोकांनी दिलेला महत्त्वपूर्ण संदेश समजतो. आत्मसात करण्यासारखे आणि विचार करण्यासारखे बरेच काही आहे", असंही सुनक यांनी म्हटले आहे.












Click it and Unblock the Notifications