पश्चिम आशियावर संकट! येमेनने इस्रायलवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला! बेरूतमध्ये IDFचा हवाई हल्ला
West Asia Conflict : युद्धजन्य स्थितीमुळे पश्चिम आशियातील परिस्थिती गंभीर होत आहे. दरम्यान, येमेनने सोमवारी इस्रायलवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागण्यास सुरुवात केली. हल्ल्यादरम्यान सायरन वाजू लागले आहेत. यामुळे एकीकडे हमास दुसरीकडे इराण आणि तिसरीकडे येमेनशी इस्त्रायलचा लढा सुरु आहे.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पृष्ठभागावरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणानंतर इस्रायलच्या मध्यवर्ती भागात सायरन वाजू लागले. आयडीएफने एका निवेदनात म्हटले आहे की, येमेनमधून इस्रायलवर डागण्यात आलेले बॅलिस्टिक क्षेपणास्त्र इस्रायलच्या हवाई संरक्षणाने यशस्वीरित्या रोखले गेले.

टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, एरो लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीद्वारे हे क्षेपणास्त्र पाडण्यात आले. वास्तविक, एरो लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची रचना बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे पाडण्यासाठी केली गेली आहे. हे क्षेपणास्त्र इतर देशांची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करते. इस्रायलच्या तेल अवीवमध्ये गेल्या वर्षी हमासने केलेल्या नरसंहारानंतर पश्चिम आशियामध्ये अशांततेचे वातावरण आहे.
ईडीएफ गाझा आणि पॅलेस्टाईनमधील हमासच्या स्थानांना सतत लक्ष्य करत आहे. अलीकडेच, इराण समर्थित दहशतवादी संघटना हिजबुल्लाहचा मुख्य कमांडर सय्यद नसराल्लाह हसन, लेबनॉनमध्ये आयडीएफच्या हवाई हल्ल्यात मारला गेला.
त्यानंतर इराणने इस्रायलवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. जुलैच्या सुरुवातीला हमासचा प्रमुख इस्माईल हनीयेह तेहरानमध्ये मारला गेला. यानंतर हिजबुल्लाच्या मुख्य कमांडरची हत्या करण्यात आली. अशा स्थितीत इराणने दोन्ही प्रसंगी सूड उगवण्याची शपथ घेतली होती.
7 ऑक्टोबर रोजी इस्रायलमध्ये हमासने केलेल्या हल्ल्याचा आज पहिला वर्धापन दिन आहे, ज्यात 1200 हून अधिक लोक मारले गेले आणि सुमारे 250 लोकांना ओलिस बनवले गेले.












Click it and Unblock the Notifications