स्वित्झर्लंडच्या पर्वतरांगांमध्ये हिमनदी फुटली; अख्खं गाव ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं, पाहा-थरारक Video
स्वित्झर्लंडमधील आल्प्समध्ये नुकतीच मोठी दुर्घटना घडली आहे. ज्यामध्ये एक मोठी हिमनदी फुटली आणि मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. या घटनेचे व्हिडिओ आता व्हायरल झाले असून एका व्हिडिओत एक अख्ख गावं भूस्खलनात कसे गाडलं गेलं हे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. व्हायरल झालेल्या या थरारक व्हिडिओने प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही, हे देखील तितकेच सत्य आहे.

काही माध्यमांच्या माहितीनुसार, व्हिडिओमध्ये जे गाव दबल्याचे दिसून येतंय, त्या गावात सुमारे तीनशे लोक राहत होते. हिमनदी फुटली तातडीने या गावातील लोकांना घटनास्थळारुन स्थलांतरीत करण्यात आले, त्यामुळे जीवीतहानी टाळता आली. परंतु, अख्ख गावच यामध्ये दबले गेल्याने सदर लोकांचे मोठे नुकसान झाले आहे.
Exoplanet...
— Black Hole (@konstructivizm) May 29, 2025
The moment the glacier collapses in Switzerland and the aftermath pic.twitter.com/bFNJShlcpq
त्याच वेळी, या घटनेचे संपूर्ण दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, हिमनदी फुटल्यानंतर धूळ आणि ढिगाऱ्यांचा एक मोठा ढग डोंगरावरून वेगाने कसा खाली वाहू लागला हे थरारक चित्र आता त्यात दिसत आहे.
अपघात कसा झाला?
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण स्वित्झर्लंडच्या व्हॅले कॅन्टन भागात असलेल्या ब्लॅटन नावाच्या गावात ही दुर्घटना घडली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, किमान एक माणूस अजूनही बेपत्ता आहे. प्रत्यक्षात, हिमनदी फुटली आणि बर्फ, चिखल आणि दगडांसह खाली पडली. यामुळे भूस्खलनसारखी परिस्थिती निर्माण झाली आणि गाव ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहे. या ठिकाणी आता बचावाच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत.
गाव पुन्हा उभं करणं सर्वात मोठं आव्हान!
सरकारी बर्च ग्लेशियर ज्यावर सुमारे ९० लाख टन कचरा जमा झाला होता. सरकारी अभियंते म्हणतात की हा हिमनदी दररोज ८ ते ११ फूट खाली सरकत होता आणि शेवटी घसरून पडला. ज्यामध्ये एक गाव ढिगाऱ्यात रूपांतरित झाले. त्याच वेळी, सरकार म्हणते की गाव पुन्हा बांधण्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात आणि नुकसान किती झाले आहे हे अद्याप निश्चित केले जात आहे.












Click it and Unblock the Notifications