Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ट्रम्प मंत्रिमंडळात सहभागी झाल्यानंतर गुगलवर सर्वाधिक सर्च केले गेलेले विवेक रामास्वामी कोण आहेत ?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारली आहे. ट्रम्प हे 47 वे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. त्यानंतर विवेक रामास्वामी हे Google वर सर्वाधिक शोधले जाणारे नाव बनले आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्येष्ठ उद्योगपती एलोन मस्क आणि उद्योजक विवेक रामास्वामी यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. ते आता सरकारी कार्यक्षमता विभागाचे (DOGE) नेतृत्व करतील.

अब्जाधीश इलॉन मस्क सोबत विवेक रामास्वामी नव्याने तयार केलेल्या डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशिअन्सी (DOGE) चे नेतृत्व करणार आहेत. हा उपक्रम ट्रम्प यांच्या सरकारी खर्चावर देखरेख वाढवण्याच्या त्यांच्या मोहिमेचे वचन पूर्ण करण्याच्या योजनेचा एक भाग आहे, या प्रयत्नात मस्क महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

vivek ramaswamy

ट्रम्प यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, मस्क आणि रामास्वामी माझ्या प्रशासनासाठी सरकारी नोकरशाही दूर करण्याचा, अतिरिक्त नियम कमी करण्यासाठी, फालतू खर्चात कपात आणि फेडरल एजन्सीची पुनर्रचना करण्याचा मार्ग मोकळा करतील. 4 जुलै 2026 रोजी अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा 250 वा वर्धापन दिन असेल तेव्हा त्यांची जबाबदारी संपेल असेही त्यांनी सांगितले. हे कार्यक्षम सरकार देशाला 'भेट' ठरेल.

गुगल ट्रेंडमध्ये रामास्वामी हा चर्चेचा विषय बनला आहे

गुगल ट्रेंडनुसार रामास्वामी यांचे नाव 10,000 हून अधिक लोकांनी त्यांच नाव सर्च केलं आहे. बुधवारी सकाळी भारतात केवळ तीन तासांमध्ये 900 टक्क्यांनी वाढ दर्शवते. विवेक रामास्वामी हे एक प्रमुख भारतीय-अमेरिकन उद्योजक आणि रिपब्लिकन राजकारणी आहेत. जे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी ठाम मतांसाठी आणि कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.

दक्षिण भारतातील ओहायोमध्ये जन्मलेले आणि वाढलेले रामास्वामी स्वतःला हिंदू मानतात. रोमन कॅथोलिक हायस्कूलमध्ये त्यांनी आपलं शिक्षण घेतलं आहे. रामास्वामी यांनी हार्वर्ड विद्यापीठातून जीवशास्त्रात पदवी मिळवली आणि नंतर येल लॉ स्कूलमधून पदवी प्राप्त केली. 38 व्या वर्षी ते एक करोडपती आणि माजी बायोटेक एक्झिक्युटिव्ह आहेत.

गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये राष्ट्राध्यक्षपदाची शर्यत जाहीर केल्यानंतर त्यांना बराच काळ महत्वाचे उमेदवार मानले जात होते. परंतु नंतर त्यांनी उमेदवारी मागे घेतली आणि डोनाल्ड ट्रम्प यांना आपला पाठिंबा दिला. रामास्वामी यांनी ट्रम्प यांचा जोरदार समर्थन केलं आहे.

विवेक रामास्वामी स्वत:ला अभिमानाने हिंदू म्हणून सांगत असले तरी ते असेही म्हणतात की, अमेरिकेची स्थापना 'ख्रिश्चन मूल्ये' आणि 'ख्रिश्चन-ज्यू तत्त्वांवर' झाली आहे. परंतु, हिंदू मूल्ये यापेक्षा वेगळी नाहीत आणि हिंदू धर्म शांततेच्या तत्त्वावर चालतो, असेही ते म्हणतात.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+