Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Video : लाल समुद्रात टायटॅनिकसारखे जहाज बुडाले.! हुथी बंडखोरांनी मिसाईल डागल्या, थरारक घटना!

Yemen Houthi rebels attack Video Viral : येमेनच्या हुथी बंडखोरांनी लाल समुद्रात 'मॅजिक सीज' नावाच्या एका वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला केला. ही घटना 6 जुलै 2025 रोजीची आहे.

दरम्यान, या हल्ल्याचा व्हिडिओ देखील समोर आला असून त्यात जहाजाचे काही क्षणांमध्ये कसे तुकडे झाले आणि कसा स्फोट घडला याचा थरार दिसत आहे.

लायबेरिया या देशाचा ध्वज होता जहाजावर!

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या जहाजावर हल्ला झाला. त्या जहाजावर लायबेरियाचा ध्वज होता आणि ते ग्रीक लोकांचे असल्याची माहिती आहे.

काही माध्यमांच्या अहवालानुसार, हुथी बंडखोरांनी या जहाजावर ड्रोन, क्षेपणास्त्रे, रॉकेट-लाँचर आणि लहान शस्त्रांनी हल्ला केला. काही क्षणातच जहाजाला आग लागली आणि एका मोठ्या स्फोटानंतर त्याचे दोन तुकडे झाले.

viral video

हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल, सोशल मीडियावर धुमाकूळ!

हुथी बंडखोरांनी हल्ल्याचा व्हिडिओ देखील जारी केला, ज्यामध्ये जहाजावर जोरदार स्फोट होताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये जहाजचा स्फोट कसा झाला ते पूर्णपणे दिसत आहे.

शेवटी समुद्रात बुडताना दिसत आहे. हुथींनी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे आणि म्हटले आहे की, जहाज इस्रायलवर लादलेल्या त्यांच्या नाकेबंदीचे उल्लंघन करत होते.

किती लोकांचा झाला मृत्यू?

युरोपियन युनियन नौदल मोहिम 'ऑपरेशन अ‍ॅस्पाइड्स' ने मंगळवारी पुष्टी केली की, हल्ल्यात 3 खलाशी ठार झाले आणि 2 जखमी झाले, त्यापैकी एकाने आपला पाय गमावला.

जहाजावरील 22 क्रू मेंबर्सनी आपले प्राण वाचवण्यासाठी जहाजातून उडी मारली आणि नंतर त्यांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले. सशस्त्र सुरक्षा कर्मचाऱ्यांनी प्रत्युत्तर दिले. परंतु त्यांना त्यात यश मिळाले नाही.

आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यक्त होतेय चिंता

या हल्ल्यानंतर, आंतरराष्ट्रीय समुदायाने या कृतीचा निषेध केला आहे. या प्रदेशातील वाढता तणाव कमी करण्याचे आवाहन केले आहे. हा हल्ला केवळ सागरी सुरक्षेला आव्हान देत नाही. तर मध्य पूर्वेतील आधीच गुंतागुंतीच्या भू-राजकीय परिस्थितीलाही गुंतागुंतीचा करत असल्याचा दावा काही देशांनी व्यक्त केला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+