VIDEO : पाळीव सिंह पिंजऱ्यातून निघाला अन् थेट महिलेसह तिच्या दोन मुलांवर हल्ला केला; थरारक व्हिडिओ!
Viral video : पाकिस्तानातील लाहोर शहरात पाळीव सिंहाचा एक थरारक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा सिंह एका भींतीवर उडी मारून थेट वस्तीत घुसला अन् त्याने एका महिलेवर आणि तिच्या दोन लहान मुलांना हल्ला करून जखमी केले. नुकताच हा हल्ला झाला असून या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा सिंह त्याच्या पिंजऱ्यातून बाहेर आला आणि एका निवासी भागात घुसला अन् तिथे उपस्थित असलेल्या महिलेवर हल्ला केला. तिच्या पाच आणि सात वर्षांच्या मुलांवर हल्ला झाल्याने ते दोघेही गंभीर जखमी झाले. या हल्ल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर त्या व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

मालकाने सिंहाला रोखलेही नाही
लाहोर पोलिसांनी हल्ला करणाऱ्या सिंह मालकाविरुद्ध परवान्याशिवाय सिंह पाळल्याबद्दल आणि निष्काळजीपणाबद्दल गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अधिकारी फैसल कामरान यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सिंहाच्या हल्ल्यात महिला आणि मुलांच्या चेहऱ्यावर आणि हातावर जखमा झाल्या आहेत.
पोलिसांच्या अहवालानुसार, मुलांच्या वडिलांनी सांगितले की सिंहाचा मालक घटनास्थळी उपस्थित होता, परंतु त्याने सिंहाला थांबवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही.
फक्त उभा राहून सर्व काही पाहत राहिला. काही काळानंतर, सिंह स्वतःहून त्याच्या मालकाच्या फार्महाऊसवर परतला, तेथून पोलिस आणि वन्यजीव अधिकाऱ्यांनी त्याला पकडले आणि प्राणीसंग्रहालयात नेले.
In Pakistan, a man was detained by wildlife authorities after his pet lion escaped in Lahore, injuring at least three people in a residential area. All victims are now in stable condition. pic.twitter.com/4XADzqeGlp
— Volcaholic 🌋 (@volcaholic1) July 4, 2025
पाकिस्तानमध्ये सिंह पाळणे हे एक स्टेटस!
अलीकडेच, लाहोरमधील वन्यजीव कायद्यात बदल करण्यात आले आहेत, त्यानुसार जर असा गुन्हा आढळला तर त्या व्यक्तीला 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 50 लाख पाकिस्तानी रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
पाकिस्तानमधील अनेक श्रीमंत लोक सिंह, वाघ, बिबट्यासारखे धोकादायक आणि विदेशी प्राणी पाळणे हे स्टेटस सिम्बॉल मानतात.
लोक ते शक्ती आणि संपत्तीचे प्रतीक देखील मानतात. तथापि, यासाठी कायदेशीर परवानगी आणि खूप जास्त शुल्क भरावे लागते. याशिवाय, आवश्यक सुरक्षा व्यवस्था करणे आवश्यक आहे, परंतु बहुतेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात.
पोलिसांनी 13 सिंह केले जप्त!
पाकिस्तानमध्ये, मोठ्या मांजरींना कायदेशीररित्या पाळीव प्राणी म्हणून ठेवण्यासाठी, त्यांची नोंदणी करावी लागते आणि प्रत्येक प्राण्यासाठी 50 हजार पाकिस्तानी रुपये (सुमारे $१७६) एकवेळ शुल्क भरावे लागते.
नियमांनुसार, हे धोकादायक प्राणी फक्त शहराबाहेरच ठेवता येतात. पंजाब प्रांतातील लाहोर हे पाकिस्तानचे दुसरे सर्वात मोठे शहर आहे आणि ही घटना तिथेच घडली. या घटनेनंतर, पंजाबमधील अधिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे वन्यजीव पाळणाऱ्यांविरुद्ध मोहीम सुरू केली. यामध्ये त्यांनी आतापर्यंत ५ जणांना अटक केली आहे आणि १३ सिंह जप्त केले आहेत.












Click it and Unblock the Notifications