वा रे-वा! 5 बायकांचे पती तरीही PAK पंतप्रधानांचा 'या' सुंदरीवर आलाय जीव, व्हायरल व्हिडिओ काय झालं?

Pakistan PM Shehbaz Sharif Viral Video : पहलगाम हल्ला आणि त्यानंतर भारताकडून पाकिस्तानवर करण्यात आलेले ऑपरेशन सिंदूर या सर्व घटनांमुळे दोन्ही देशात तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे. युद्धबंदीचा करार झाला असला तरी दोन्ही देशातील संबंध अजूनही ताणलेले आहेत. अशातच पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि त्या व्हिडिओने पाकिस्तानच्या प्रमुखांचा कारनामाच पुढे आणला. आधीच पाच बायकांचा पती असलेले पाकचे पंतप्रधान यांना आता सहावी देखील पत्नी आणायची की काय, असा सवाल व्हायरल व्हिडिओमुळे विचारला जाऊ लागला आहे. नेमकं व्हायरल व्हिडिओमध्ये काय घडलं, याविषयी आपण जाणून घेऊया.!

pakistan pm shehbaz sharif

भारत-पाक तणावादरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ पुन्हा एकदा त्यांच्या रंगीबेरंगी मूडमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. यावेळी चर्चा त्यांच्या कोणत्याही राजकीय विधानांबद्दल नाही, तर एका व्हायरल व्हिडिओबद्दल आहे. ज्यामध्ये ते पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेनला पुरस्कार देताना तिच्याकडे खास नजरेने पाहत आहेत. त्यांनी ज्या पद्धतीने त्या अभिनेत्रीची 'डीप स्कॅनिंग'ने केली, तो व्हिडिओ सोशल मीडियावर खळबळ उडवून देणार आहे. तर लोक आता सहावी पत्नी आणता की काय, असा सवाल करू लागले आहेत.

व्हिडिओ कधी व कोणत्या कार्यक्रमातला

मुळात, हा व्हायरल व्हिडिओ 2023 च्या एका समारंभातील असल्याचे सांगितले जात आहे. पंजाबच्या गव्हर्नर हाऊसमध्ये हा सोहळा पार पडला होता. यामध्ये, शाहबाज शरीफ अभिनेत्री मावराचा सन्मान करताना खास अंदाजामध्ये दिसले. कॅमेऱ्याने त्यांच्या डोळ्यातील चढ-उतार अतिशय जबरदस्त रित्या टीपले अन् त्यानंतर हा व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावर आला तेथूनच विनोद, मीम्स आणि चर्चांना उधाण आले.

कोण आहे मावरा होकेन?

मावरा होकेन ही एक प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री आहे जिने 2016 मध्ये 'सनम तेरी कसम' या बॉलिवूड चित्रपटातून पदार्पण केले. अलीकडेच तिने भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर टीका केली तेव्हा ती वादात सापडली होती. त्यानंतर तिला पोस्टरमधून डिजिटली काढून टाकण्यात आले. या वादात, आता तिचे नाव शाहबाज शरीफशी जोडले जाणे सोशल मीडियावर केकवरचे आयसिंग अशाप्रकारचे बनले आहे.

शाहबाज शरीफांना किती आहेत बायका?

शाहबाज शरीफ यांचे वैयक्तिक आयुष्य देखील एका चित्रपटापेक्षा कमी नाही. आतापर्यंत, त्यांनी पाच वेळा लग्न केले आहे. त्यांची पहिली पत्नी ही नुसरत शाहबाज आहे, जिच्यासोबत त्यांनी 1973 साली लग्न केले. ही त्यांची पहिली आणि सर्वात स्थिर पत्नी, जिच्यापासून त्यांना 5 मुले आहेत.

  • आलिया हानी (1993 ): एक मॉडेल होती, काही महिन्यांत घटस्फोट झाला.
  • निलोफर खोसा (1993): एकाच वर्षी दुसरे लग्न आणि घटस्फोट.
  • तेहमीना दुर्रानी (2003): लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या आणि "गुप्त पहिली महिला".
  • कलसूम हया (2012): सरकारी अधिकारी, लग्न आणि घटस्फोट दोन्ही गुप्त ठेवले गेले.

एकंदरीतच शाहबाज शरीफ यांचा स्वभाव पाहता, त्यांनी मावरा होकेनकडे असे पाहणे काही गैर वाटून घेण्याचे कारण नाही, तर ते आता सहावी पत्नी तर आणू पाहत नाहीत ना, असा सवाल देखील केला जात आहे.

नेटकऱ्यांनी फार लाज काढली?

शाहबाज शरीफच्या डोळ्यांच्या 'एक्स-रे पॉवर'वर सोशल मीडिया विविध मीम्स आणि टिप्पण्यांनी भरलेला आहे. कोणी म्हणत आहे - 'डोळे खाली करा पंतप्रधान, कॅमेरा चालू आहे!', तर कोणी विचारत आहे - 'छठी कधी येणार आहे?' एका वापरकर्त्याने मावराचे वर्णन काश्मीर म्हणून केले आणि म्हटले की पाकिस्तान म्हणजेच पंतप्रधान शाहबाज आणि चीनची नजर चुकीची आहे. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले की नावाने शरीफ, स्वभावाने संशयास्पद. पाकिस्तान हट्टी आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+