Video: 'ट्रम्प मुर्दाबाद, अल्लाहू अकबर'; अशा घोषणा देऊन विमान उडवून देण्याची धमकी, एकच खळबळ!
Flight bomb threat, Video Viral : अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर विमान कंपन्यांशी संबंधित बातम्या आणि घटना रोजच चर्चेत येत आहेत. अशातच, एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती विमानात उभा राहून डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेला बॉम्बने उडवण्याची धमकी देत ओरडताना दिसत आहे. असा दावा केला जात आहे की या घटनेनंतर विमानाला मध्यभागीच परत वळवावे लागले.

व्हिडिओमध्ये काय आहे?
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी घटना इंग्लंडमधील ल्युटनहून स्कॉटलंडला जाणाऱ्या इझीजेटच्या विमानात घडल्याचे सांगितले जात आहे. एका प्रवाशाने बॉम्बने विमान उडवण्याची धमकी दिल्यानंतर ते विमान वळवण्यात आले.
व्हिडिओमध्ये तो व्यक्ती "अमेरिकेला मुर्दावाद", "ट्रम्पला मुर्दावाद" आणि "अल्लाहू अकबर" असे ओरडताना दिसत आहे. त्यानंतर इतर प्रवासी त्याला पकडून विमानाच्या जमिनीवर पाडताना दिसतात.
कॅमेरा फिरत असताना, इतर प्रवासीही या घटनेने हादरलेले आणि घाबरलेले दिसत आहेत. मात्र, या व्हिडिओच्या सत्यतेबद्दल अद्याप कोणताही अधिकृत दावा करण्यात आलेला नाही.
EASYJET FLIGHT TO SCOTLAND DIVERTED AFTER PASSENGER MAKES BOMB THREATpic.twitter.com/arxCxNYyFU
— NewsWire (@NewsWire_US) July 27, 2025
अशीच घटना यापूर्वीही घडली!
काही दिवसांपूर्वी, फ्रंटियर एअरलाइन्सच्या विमानात सहप्रवाशांवर हल्ला केल्याबद्दल आणि विचित्र विधाने केल्याबद्दल मियामीमध्ये एका 21 वर्षीय भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली होती.
इशान शर्मा नावाच्या या व्यक्तीने विमानात विचित्र वागण्यास सुरुवात केली, उपहासात्मक हसला आणि "जर तुम्ही मला आव्हान दिले तर तुम्ही मराल" अशी विधाने केली. मियामीमध्ये विमान उतरल्यानंतर शर्माला मारहाणीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.
2016 मध्येही असाच घडला होता प्रसंग!
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, जुलै 2016 मध्येही अशीच एक घटना घडली होती. यामध्ये बर्मिंगहॅमला जाणाऱ्या विमानात "अल्लाहू अकबर" असे ओरडल्याबद्दल ३८ वर्षीय शेहराज सरवर नावाच्या व्यक्तीला दहा आठवड्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. सरवरने वारंवार "अल्लाहू अकबर" असे ओरडले आणि विमान उतरताना 'बूम' असे ओरडला.
विमानाच्या गोंधळलेल्या लँडिंगनंतर ही घटना घडली, ज्यामुळे अनेक प्रवासी घाबरले. अहवालानुसार, सरवर म्हणाला की, पाकिस्तानमध्ये त्याच्या आजीच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिल्यानंतर तो अस्वस्थ झाला होता आणि त्याने त्याचे औषध घेतले नव्हते.
विमानात अशा प्रकारच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते आणि सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उभे राहतात. या व्हायरल व्हिडिओची सत्यता आणि संबंधित व्यक्तीवर काय कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.












Click it and Unblock the Notifications