अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींच्या पत्नी उषा व्हॅन्संचे भारताशी काय आहे नाते? त्यांची संपत्ती घ्या जाणून

Usha Vance Net Worth : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हॅन्स त्यांच्या पत्नी उषा व्हॅन्ससोबत पुढील आठवड्यात भारत दौऱ्यावर येत आहेत. जेडी व्हॅन्स यांची पत्नीचे नावच उषा हे आहे, त्यामुळे हे तर भारतीय नाव असल्याने अमेरिकेच्या उपाध्यक्षाच्या पत्नीचे भारताशी काही न् काही नाते असणारच याचा नाव वाचून सर्वांनाच अंदाज येणार आहे. आम्ही सांगतो की, होय..अमेरिकेच्या उपाध्यक्षांच्या पत्नीचा भारताशी संबंध आहे तो काय आहे हे आपण जाणून घेऊया.

उपाध्यक्ष जेडी आणि उषा व्हॅन्स हे दोघे भारत दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार आहेत. असे सांगितले जात आहे की, व्हॅन्स दाम्पत्य 21 ते 24 एप्रिल दरम्यान भारताला भेट देऊ शकतात. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलंही असू शकतात.

Usha Vance Net Worth

उषा व्हॅन्स कोण आहेत?

उषा बाला चिलुकुरी व्हान्स यांचा जन्म 6 जानेवारी 1986 रोजी झाला. त्या अमेरिकन वकील आहेत, ज्या 2025 पासून अमेरिकेच्या द्वितीय महिला नागरीक आहेत. त्यांचे लग्न अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांच्याशी झाले आहे. त्या पहिल्या आशियाई अमेरिकन आणि पहिली हिंदू अमेरिकन दुसरी महिला आहे.

भारतातून अमेरिकेत स्थलांतरीत कुटुंबात जन्म

उषा व्हॅन्स यांचा जन्म कॅलिफोर्नियातील सॅन दिएगो काउंटी येथे तेलुगु भारतीय स्थलांतरित कुटुंबात झाला आणि त्या एका उच्च-मध्यमवर्गीय उपनगरात वाढली. त्यांनी येल विद्यापीठातून इतिहासात पदवी आणि येल लॉ स्कूलमधून ज्युरिस डॉक्टर पदवी प्राप्त केली.

उषा व्हॅन्स यांचे पालक कोण?

उषा व्हॅन्स यांचा भारताशी थेट संबंध आहे. त्यांचे आई-वडील भारतातच होते. त्यांचे आई-वडील आंध्र प्रदेशातील होते. नंतर ते अमेरिकेत जाऊन स्थायिक झाले. उषा मात्र, अमेरिकेत जन्मल्या आणि वाढल्या. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मी आणि वडिलांचे नाव राधाकृष्ण आहे. ते आंध्र प्रदेशचे रहिवासी होते आणि 1980 मध्ये अमेरिकेत स्थायिक झाले होते. उषाची आई जीवशास्त्रज्ञ आहे आणि वडील अभियंता आहेत.

उषा व्हॅन्स यांची संपत्ती किती आहे?

2014 मध्ये उषा यांनी जेडी व्हॅन्स यांच्यासोबत लग्न केले. उषा आणि जेडी व्हॅन्स या दोघांनी लग्नात पारंपारिक भारतीय पोशाख परिधान केला होता. उषा व्हॅन्स यांच्या संपत्तीचा विचार केल्यास, मीडिया रिपोर्ट्सनुसार, उषा आणि त्यांचे पती जेडी वन्स यांच्याकडे संपत्ती अफाट आहे. व्हॅन्स रिअल इस्टेट, म्युच्युअल फंड, क्रिप्टोकरन्सी इत्यादींमध्ये त्या गुंतवणूक करतात.

फोर्ब्सच्या मते, जेडी व्हॅन्सची एकूण संपत्ती सुमारे $10 दशलक्ष (सुमारे 85 कोटी रुपये) आहे. ऑगस्ट 2014 मध्ये, उषा व्हॅ न्स आणि जेडी व्ह्ॅन्स यांनी लग्नानंतर वॉशिंग्टन डीसीमध्ये 5 कोटी 37 लक्ष 8 हजार रुपयांचे घर खरेदी केले. फोर्ब्सच्या अहवालानुसार, घराची किंमत आता सुमारे 7 कोटी 25 लाख 79 हजार 164 रुपये इतकी आहे. उषा आणि जेडी व्हॅन्सने सिनसिनाटीच्या ईस्ट वॉलनट हिल्समध्ये $1.4 मिलियनमध्ये एक घर विकत घेतले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+