भारतीय वंशाच्या उषा आणि अमेरिकन उपराष्ट्राध्यक्षांचे प्रेम कसे जुळले? कशी आहे त्यांची Lovestory वाचा
Usha Vance and US Vice President JD Vance Love Story : अमेरिकेचे द्वितीय नागरिक उपाध्यक्ष जेडी व्हॅन्स आणि त्यांच्या पत्नी उषा व्हॅन्स पुढील आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने ही घोषणा केली. जेडी व्हॅन्स या पाच सहा दिवसांत भारताचा दौरा करणार आहेत. या भेटीत त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि भारतीय वंशाच्या उषा चिलकुरी- व्हॅन्स याही येत आहेत.
उषा व्हॅन्स यांच्याबाबत सध्या प्रचंड उत्सुकता आहे कारण त्या भारताशी संबंधित आहेत. कमला हॅरीसनंतर त्या भारतीय वंशांच्या अमेरिकन नागरिक आहेत ज्या युएसच्या राजकीय क्षेत्रात सर्वोच्चपदावर पोहचल्या आहेत. उषा व्हॅन्स याही राजकारणात होत्या पण त्यानंतर त्यांचे पती जेडी हे सक्रीय झाले आणि राजकारणाची सूत्रे त्यांच्याकडे गेली.

उषा व्हॅन्स यांचे जेडी यांच्याशी कसे जुळले प्रेम?
उषा आणि जेडी वन्स यांची पहिली भेट येल लॉ स्कूलमध्ये झाली, तिथे दोघे शिकत होते. उषा यांनी त्यांच्या मुलाखतींमध्ये सांगितले आहे की, त्या आणि जेडी व्हॅन्स पूर्वी मित्र होते. त्या म्हणाल्या, 'आम्ही आधी मित्र होतो. ' पुढे दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. जेडी व्हॅन्स यांनी त्यांच्या हिलबिली एलेगी या पुस्तकात उषाबद्दलच्या त्यांच्या सुरुवातीच्या भावनांचे वर्णन केले आहे: "मी नेहमी तिच्याबद्दल विचार करायचो."
एका मित्राने मला प्रेमात दुःखी असल्याचे म्हटले तर दुसऱ्याने मला अशा स्थितीत कधीही पाहिले नव्हते. जेव्हा कळले की उषा या अविवाहित आहेत, तेव्हा मित्रांनी मला लगेच तिला घेऊन डेटला जायला सांगितले. यानंतर आमच्या दोघांचे नाते हळूहळू पुढे गेले असे पुस्तकात आहे.
लग्न भारतीय कि ख्रिश्चन पद्धतीने?
उषा चिलुकुरी आणि व्हॅन्स यांनी 2014 मध्ये केंटकी येथे आंतरधर्मीय विवाह सोहळ्यात लग्न केले. तिच्या पतीचा मित्र जमील जिवानी याने बायबल वाचले आणि एका हिंदू पंडिताने या जोडप्याला आशीर्वाद दिला. उषा या एक हिंदू आहेत आणि त्यांचे पती जेडी ख्रिश्चन आहेत. ज्यांचे संगोपन इव्हँजेलिकल पद्धतीने झाले होते परंतु 2019 मध्ये त्यांनी कॅथोलिक धर्म स्वीकारला.
उषा व्हॅन्स आहेत शाकाहारी
उषा व्हॅन्स शाकाहारी आहेत. 2024 च्या रिपब्लिकन नॅशनल कन्व्हेन्शनमध्ये त्यांनी सांगितले की, त्यांच्या पतीने "माझ्या शाकाहारी आहाराशी जुळवून घेतले आहे आणि माझ्या आईकडून - भारतीय अन्नपदार्थ शिजवायला शिकले आहे." हे दाम्पत्य ओहायोमधील सिनसिनाटी येथे राहतात आणि त्यांना तीन मुले आहेत.












Click it and Unblock the Notifications