Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

लेडीज फर्स्ट... विमानतळावर दिसली अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींची कौटुंबिक झलक, काय-काय करणार? वाचा

अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वैन्स यांनी आजपासून भारतातील चार दिवसांच्या दौऱ्याला सुरुवात केली. दिल्लीतील पालम विमानतळावर एअर फोर्स-२ च्या विमानाने सकाळी दहाच्या सुमारास त्यांचे भारतात आगमन झाले. त्यांच्यासोबत पत्नी उषा व्हान्स, त्यांची मुलगी आणि अमेरिकन प्रशासनातील इतर वरिष्ठ सदस्य आहेत. आज ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.

JD Vance India tour

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह जवळपास ६० देशांविरुद्ध व्यापक कर व्यवस्था लागू केली. नंतर ती काही आठवड्यांसाठी थांबवली. अशा स्थितीत उपराष्ट्रपतींचा हा त्यांचा पहिलाच भारत दौरा आहे. इटलीला भेट दिल्यानंतर व्हान्स भारतात आले आहेत. त्यांची ही भारतभेट २१ ते २४ एप्रिल दरम्यान असणार आहे.

मोदींना भेटणार

उपराष्ट्रपती जेडी वैन्स हे सुरुवातीला नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. तेथे या दोघांमध्ये अर्थव्यवस्था, व्यापार आणि भू-राजकीय संबंधांवर चर्चा होईल. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाकडून व्हान्सच्या या दौऱ्याकडे एक महत्त्वाचे राजनैतिक अभियान म्हणून पाहिले जात आहे. प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार कराराला लवकर अंतिम स्वरूप देणे तसेच दोन्ही देशांमधील संबंध आणखी सुधारण्याचे मार्ग यावर या बैठकीचे लक्ष असेल, असे सूत्रांनी सांगितले.

इतर नेतेही भेटणार

जेडी वैन्स जेव्हा पंतप्रधान मोदींना भेटतील त्यावेळी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि अमेरिकेतील भारतीय राजदूत विनय मोहन क्वात्रा उपस्थित राहण्याची शक्यता आहे. भारताची अमेरिकेसोबत व्यापक धोरणात्मक जागतिक भागीदारी आहे आणि जेव्हा अशी उच्चस्तरीय भेट होते तेव्हा सर्व महत्त्वाच्या आणि संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली जाते, असे सांगितले जात आहे.

जयपूर-आग्रा येथेही भेटी

दिल्ली व्यतिरिक्त वैन्स आणि त्याचे कुटुंब जयपूर आणि आग्रा येथेही भेट देणार आहेत. व्हान्स यांच्यासोबत अमेरिकेच्या प्रशासनातील अधिकारी आहेत, परंतु भेटीदरम्यान दोन्ही बाजूंनी कोणत्याही करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता नाही, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. भारत आणि अमेरिका या वर्षी संरक्षण भागीदारीसाठी एक आराखडा तयार करण्याची अपेक्षा आहे. नवी दिल्लीत जेव्हलिन अँटी-टँक गाईडेड क्षेपणास्त्रे आणि स्ट्रायकर इन्फंट्री कॉम्बॅट व्हेईकलसह शस्त्रास्त्रे खरेदी आणि सह-उत्पादन करण्याची योजना आहे, असे फेब्रुवारीच्या बैठकीनंतर जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले होते. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांच्या पुढील काही महिन्यांत होणाऱ्या भारत भेटीदरम्यान अशा खरेदीबाबत चर्चा पुढे नेण्यात येईल, असे या प्रकरणाशी संबंधित लोकांनी सांगितले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+