..म्हणून डोनाल्ड ट्रम्पंना भारताविषयी जळजळ! अमेरिकेने अतिरिक्त टॅरीफ का लादला? 3 खरी कारणं आली समोर
US upset with India : डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या टॅरीफ धोरणांनी भारताची आणि जगाची डोकेदुखी वाढवली, पण आता भारताने रशिया, चीनशी मिळून अमेरिकेला करारा झटका देण्याची तयारी सुरु केली आहे. भारत कधीच अमेरिकेसमोर झुकला नाही आणि कधीच झुकणार नाही..भारताची परराष्ट्र निती आणि धोरण हे स्वयंभू आणि स्वतंत्र आहे हेच भारताने आतापर्यंत ट्रम्प यांना दाखवून दिले आहे.
भारतावर दुप्पट कर लादल्यानंतर अमेरिकेत ट्रम्प प्रशासनावर जोरदार टीका होत आहे. भारताचे महत्व अमेरिका समजतो हे यातून स्पष्ट होते पण आडमुठ्या ट्रम्पंना भारताला पाण्यातच पाहायचे आहे हे दिसून येते. चीनला टक्कर देण्यास जगात फक्त भारतच समर्थ आहे असे माजी अमेरिकी राजदूत निक्की हेली यांचे मत आहे आणि त्यांनी टॅरीफवरुन ट्रम्प प्रशासनाविरुद्ध टीकास्त्र सोडले आहे. डोनाल्ड ट्रम्पंची भारताविषयी खरी जळजळ काय आहे याचे कारणही आता समोर आले आहे.

अमेरिकेचा भारतावर राग का? (US upset with India )
अमेरिकेचा आरोप आहे की, जगात भारताकडून सर्वात जास्त टॅरीफ लावला जातो. या कारणाशिवाय जर आपण विचार केला तर सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत अमेरिकेची जळजळ समोर आली आहे. युक्रेन संघर्षादरम्यान रशियाच्या तेल आयातीत भारताने लक्षणीय वाढ केली यावरुन अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी टीका केली प्रकरण एवढ्यावर थांबत नाहीये, तर मुळ गोम ही की, या तेल आयातीतून भारताने कथितपणे नफा कमावला ही आहे. यामुळेच व्यापार तणाव वाढला आणि अमेरिकेने अतिरिक्त शुल्क लादले असे बेसेंट यांचे म्हणणे आहे.
अमेरिकेला का होतेय जळजळ? 3 कारणं
1. आयात वाढ : बेसेंट यांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेन युद्धापूर्वी भारताच्या एकूण तेल आयातीपैकी रशियाकडून होणारी आयात 1% पेक्षा कमी होती. आता ती वाढून 42% झाली आहे.
2. चीनसोबतची तुलना : बेसेंट यांनी चीनच्या तुलनेत भारताच्या भूमिकेला अधिक 'मनमानी' म्हटले. चीनने रशियन तेल आयात 13% वरून 16% पर्यंत वाढवली आहे, तर भारताने ती मोठ्या प्रमाणात वाढवली आहे.
3. रशियावर दबावासाठी पाऊल : यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या वस्तूंवर 25% अतिरिक्त शुल्क लावले आहे. त्यामुळे आतापर्यंत जाहीर झालेले एकूण शुल्क 50% वर पोहोचले आहे. ट्रम्प यांचा विश्वास आहे की यामुळे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर युक्रेनमधील संघर्ष संपवण्याचा दबाव येईल.
चीनवर शुल्क का नाही? तुमच्या प्रश्नाचे हे उत्तर
चीनवर शुल्क का नाही? चीनवर शुल्क न लावण्याबद्दल बेसेंट यांनी सांगितले की चीन 'दीर्घकालीन खरेदीदार' आहे आणि भारतासारख्या 'मनमानी' व्यवहारात (स्वस्त तेल खरेदी करून जास्त किंमतीत पुन्हा विकणे) तो सहभागी नाही.
युएस-भारताचा व्यापार तणाव आणखी वाढणार
युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षादरम्यान रशियाकडून भारताने तेल आयात वाढवल्यामुळे अमेरिका नाराज झाली आहे. अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी भारताच्या या भूमिकेवर तीव्र टीका केली ती यामुळेच. स्कॉट बेसेंट यांच्या या टिप्पण्यांमधून जागतिक भू-राजकीय घडामोडींमध्ये भारताच्या आर्थिक धोरणांबद्दल अमेरिकेची नाराजी स्पष्टपणे दिसून येते. यामुळे भविष्यात अमेरिका-भारत संबंधांमध्ये आणखी तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications