इराण, इस्रायलमध्ये कोणत्याही क्षणी युध्द,अमेरिकेने युद्धक्षेत्रात विमानवाहू नौका,पाणबुड्या पाठवल्या
Middle East News : अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी मध्यपूर्वेकडे मिसाईल पाणबुडी तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. संरक्षण विभागाच्या म्हणण्यांनुसार लॉयड ऑस्टिनने यूएसएस अब्राहम लिंकन विमानवाहू वाहक स्ट्राइक ग्रुपला या भागात अधिक वेगाने पाठवण्यास सांगितले आहे.
तेहरानमध्ये हमासचा नेता इस्माईल हनिया आणि बेरूतमधील एक वरिष्ठ हिजबुल्ला कमांडर यांच्या हत्येनंतर अमेरिका आणि इतर मित्र देश इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धविराम करारासाठी दबाव आणत आहेत.

अमेरिकेचं इस्रायलला संरक्षण देण्याचं आश्वासन
हमासचा नेता इस्माईल हनिया आणि हिजबुल्ला कमांडर यांच्या हत्येनंतर इस्रायलवर पलटवार होऊ शकतो. विशेषत: इराण कधीही इस्रायलवर हल्ला करू शकतो, असं अमेरिकेचे मत आहे. त्यामुळे इस्रायलवर हल्ला रोखण्यासाठी अमेरिका सातत्याने मध्यपूर्वेत शस्त्रे तैनात करत आहे .
पेंटागॉनचे प्रेस सेक्रेटरी मेजर जनरल पॅट रायडर यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, लॉयड ऑस्टिन यांनी एक दिवस इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांच्याशी बोलणं झालं आहे. इस्रायलचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक संभाव्य पाऊल उचलण्यासाठी अमेरिका तयार आहे. वाढत्या प्रादेशिक तणावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मध्यपूर्वेमध्ये यूएस लष्करी शक्ती आणि क्षमता बळकट करत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
आशिया पॅसिफिक प्रदेशात स्थित यूएसएस अब्राहम लिंकनला मध्यपूर्वेतून मायदेशी परतणार असलेल्या यूएसएस थिओडोर रुझवेल्ट विमानवाहू वाहक स्ट्राइकची जागा घेण्याचे आधीच आदेश देण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यात लॉयड ऑस्टिन म्हणाले की, अब्राहम लिंकन एअरक्राफ्ट कॅरियर स्ट्राइक ग्रुप महिन्याच्या अखेरीस सेंट्रल कमांड एरियामध्ये पोहोचेल. या विमानवाहू जहाजावर F-35 लढाऊ विमाने आहेत, तसेच F/A-18 लढाऊ विमाने आहेत, ज्यात कोणताही हल्ला करण्याची क्षमता आहे.












Click it and Unblock the Notifications