धार्मिक हिंसेवर अमेरिकेचा धक्कादायक अहवाल; भारतात अल्प अल्पसंख्यांक समाजावरील हिंसाचार वाढला?
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केला आहे. धार्मिक हिंसेशी संबंधित हा अहवाल आहे. भारतात अल्पसंख्याकांविरुद्ध द्वेषयुक्त भावना वाढत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. अल्पसंख्याकांची घरे आणि त्यांची प्रार्थनास्थळे पाडण्याच्या घटना वाढत आहेत, अशी नोंद करण्यात आली आहे.

चिंताजनक बाब - परराष्ट्र खाते
याबाबत बोलताना अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटोनी ब्लिंकन म्हणाले की, भारतात अल्पसंख्याकांविरुद्ध द्वेषयुक्त भाषण, त्यांची घरे आणि प्रार्थनास्थळे उद्ध्वस्त करण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. हे निरीक्षण आम्ही नोंदविले आहे. ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
मुस्लिम टार्गेटवर?
या अहवालात मुंबईजवळ रेल्वेत तीन मुस्लिम तरुणांना गोळ्या घातल्याच्या घटनेचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, अद्याप या अहवालावर भारतीय दूतावासाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पण भारत सरकार सुरुवातीपासूनच अल्पसंख्याकांविरुद्ध भेदभाव होत असल्याचं नाकारत आले आहे.
धुमसनारे मणिपूर :
अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाच्या अहवालात मणिपूरमधील हिंसाचाराचा उल्लेख करण्यात आला आहे. मणिपूरमध्ये गेल्या वर्षी मे महिन्यात अल्पसंख्याक, कुकी आणि मेईतेई समुदायांमध्ये हिंसाचार उसळला होता. या घटनांचा संदर्भ देत मणिपूरमध्ये हिंदू आणि ख्रिश्चनांची प्रार्थनास्थळे पाडण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. 250 चर्च पाडल्याचाही उल्लेख आहे. या हिंसाचारात 200 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला, तर 60 हजारांहून अधिक लोक बेघर झाले.त्यामुळे आता एका अहवालातून करण्यात आलेला हा दावा भारतीय परराष्ट्र खाते कसा खोडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे












Click it and Unblock the Notifications