Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

US Presidential Election 2024 : कोण आहेत उषा वन्स, ट्रम्प यांच्या विजयानंतर का आहेत चर्चेत ?

US Presidential Election 2024 : संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणूकीत पुन्हा एकदा ट्रम्प यांनी बाजी मारली आहे. डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होणार आहेत. ट्रम्प यांनी आपल्या विजयाचे श्रेय आपल्या समर्थकांना दिले आहे. आपल्या विजयी भाषणादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार जेडी वन्स आणि त्यांची पत्नी उषा वन्स यांचं भरभरुन कौतूक केलं आहे. त्यानंतर उषा वन्स चर्चेत आल्या आहेत.

फ्लोरिडा येथील पाम बीच काऊंटी कन्व्हेन्शन सेंटरमधील भाषणादरम्यान ट्रम्प म्हणाले, 'मला अभिनंदन करणारा पहिला व्यक्ती व्हायचं आहे.'आता मी उपराष्ट्रपती-निर्वाचित जेडी व्हॅन्सचे यांचे अभिनंदन करू शकतो. मी त्यांची सुंदर पत्नी उषा वन्स यांचे खूप अभिनंदन आणि शुभेच्छा देऊ इच्छितो', असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

Usha Vance

उषा वन्स या अमेरिकेच्या पहिल्या भारतीय वंशाच्या दुस-या महिला बनणार आहेत. त्याचे पालक भारतीय आहेत आणि ते भारतातील आंध्र प्रदेशचे आहेत. 1986 मध्ये युनायटेड स्टेट्सला ते स्थायिक झाले होते. उषा वन्स यांचा जन्म सॅन दिएगो येथे झाला आणि त्यांनी येल विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतलं आहे. त्या इतिहास पदवीधर आणि कायदा पदवीधर आहेत.

उषा वन्स या सॅन फ्रान्सिस्कोमधील एका प्रतिष्ठित फर्ममध्ये कॉर्पोरेट लिटिगेटर म्हणून काम करतात. त्यांनी कायदेशीर क्षेत्रात काम करण्यापूर्वी चार वर्षे येल विद्यापीठात शिक्षण घेतलं आहे. तसेच येल जर्नल ऑफ लॉ अँड टेक्नॉलॉजीचे व्यवस्थापकीय संपादक आणि येल लॉ जर्नलचे कार्यकारी विकास संपादक म्हणूनही काम केले आहे. उषा वन्स आणि ओहायो सिनेटर जेडी वन्स यांची पहिली भेट येल लॉ स्कूलमध्ये झाली, जिथे त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. या जोडप्याने 2014 मध्ये केंटकीमध्ये लग्न बंधनात अडकले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+