निवडणुकीच्या 2 दिवस आधी कमला हॅरिसने पलटवली बाजी ? ट्रम्पच्या हातातून सर्वात सुरक्षित राज्य निसटले?
US Presidential Election 2024 : अवघ्या दोन दिवसांवर अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहे. आता त्याआधीच एका निवडणूक सर्वेक्षणात रिपब्लिकन पक्षासाठी सर्वात सुरक्षित मानले जाणारे राज्य डोनाल्ड ट्रम्प यांच्या हातातून निसटताना दिसत आहे. आयोवा येथे केलेल्या सर्वेक्षणात अनपेक्षितपणे कमला हॅरिस यांनी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात आघाडी दाखवण्यात आली आहे. अलीकडील आलेल्या डेटाने अमेरिकन मतदानकर्त्यांना आश्चर्यचकित केले आहे. कारण सुरुवातीपासूनच आयोवा हे रिपब्लिकन पक्षासाठी सुरक्षित राज्य मानले जात होते.

डेस मोइनेस रजिस्टर वृत्तपत्राने घेतलेल्या सेल्झर पोलमध्ये कमला हॅरिस यांना तीन गुणांनी आघाडीवर असल्याचे दाखवण्यात आले आहे. आयोवा हे मध्य-पश्चिमी राज्य 2024 च्या निवडणुकीसाठी सात स्विंग राज्यांपैकी नाही आणि 2016 आणि 2020 मध्ये राज्याने डोनाल्ड ट्रम्प यांना मतदान केले. मात्र ही जागा ट्रम्प यांच्या हातातून निसटल्यास त्यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जाईल. ताज्या सर्वेक्षणात कमला हॅरिस यांना 44 टक्क्यांच्या तुलनेत ट्रम्प यांच्या विरोधात 47 टक्के मते मिळण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले होते. याच संस्थेच्या सप्टेंबरमध्ये झालेल्या मतदानात ट्रम्प यांना कमला हॅरिस यांच्यावर चार गुणांची आघाडी दाखवण्यात आली होती.
आयोवा राज्यचा कौल काय आहे ते लवकरचं स्पष्ट होईल. मात्र परंतु नवीन आलेल्या सर्व्हेने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. आयोवा राज्याचा निकाल काय आहे, हे सांगणे सध्यातरी कठीण आहे. सेल्झर अँड कंपनीचे अध्यक्ष जे एन सेल्झर यांनी रजिस्टरला सांगितले की, राज्यातील महिलांमध्ये कमला हॅरिस यांना मोठी आघाडी मिळत असल्याचे या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. मतदान जाहीर झाल्यानंतर काही राजकीय पंडित आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. त्याचं म्हणं आहे की, आयोवामध्ये ट्रम्प यांना आघाडी मिळेल.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे माजी शीर्ष सहाय्यक डेव्हिड एक्सेलरॉड म्हणाले, "हे एक धक्कादायक सर्वेक्षण आहे. परंतु त्यांच्या राज्यातील निवडणुकीच्या निकालांचा अंदाज लावण्याचा ऍन सेल्त्झरचा रेकॉर्ड कोणत्याही पोलस्टरच्या प्रमाणेच उत्कृष्ट आहे. ही वाढ महिलांनी केली आहे." देशासाठी एक चांगले संकेत आहेत.












Click it and Unblock the Notifications