Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

US Presidential Election 2024 ट्रम्प की कमला हॅरिस, कोणाच्या विजयाचा भारताला जास्त फायदा ?

US Presidential Election 2024 : संपूर्ण जगाच्या लक्ष अमेरिकेच्या निवडणूक निकालाकडे लागलं आहे. अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडीसाठी मतदान पार पडल्यानंतर आता मतमोजणी सुरु आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार व अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार व विद्यमान उपाध्यक्षा कमला हॅरिस यांच्यात राष्ट्राध्यक्षपदासाठी थेट लढत पहायला मिळत आहे.

भारतासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प की कमला हॅरिस झाल्यावर भारताला फायदा की नुकसान होऊ शकते? हे जाणून घेऊया

भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांच्या आई श्यामला गोपालन या तामिळनाडूच्या रहिवासी आहेत. त्याचे वडील मूळचे जमैकाचे रहिवासी आहेत.अमेरिकेत भेटल्यानंतर त्याच्या पालकांनी लग्न केले. मात्र नंतर दोघांचा घटस्फोट झाला. कमला हॅरिस अनेक वेळा त्यांच्या आईसोबत चेन्नईमध्ये तिच्या आजोबांच्या घरी आल्या आहेत.

Donald Trump and Kamala Harris

अमेरिकेच्या उपराष्ट्रपती असताना कमला हॅरिस यांनी भारतीय मुद्द्यांवर फारसे बोलले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात त्यांनी कमला हॅरिस यांची भेट घेतली होती. तेव्हाही भारताचे पंतप्रधान मोदी यांच्याशी फारशी केमिस्ट्री नव्हती. तर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे प्रशासन अनेक देशांतर्गत मुद्द्यांवर भारताविरोधात वक्तव्ये केली. अमेरिकन मंत्र्यांनी भारतातील लोकशाहीवर अल्पसंख्याक आणि मानवी हक्कांवर अनेकदा प्रश्न उपस्थित केले आहेत.

कमला हॅरिस यांचे काश्मीर बाबत वक्तव्य

अमेरिकेच्या उपराष्ट्रपती असताना कमला हॅरिस यांनी काश्मीरबाबत वादग्रस्त विधाने केली आहेत. 2019 मध्ये जेव्हा भारताने जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा संपुष्टात आणण्यासाठी संविधानातील कलम 370 रद्द केले होते. तेव्हा कमला हॅरिस म्हणाल्या होत्या की, काश्मिरींना हे लक्षात ठेवायला हवे की, ते जगात एकटे नाहीत. गरज पडल्यास हस्तक्षेप करावा लागेल.

भारतीय आयटी क्षेत्राला होणार फायदा

कमला हॅरिस उर्जेच्या अपारंपारिक स्त्रोतांना म्हणजेच अक्षय उर्जेला प्रोत्साहन देण्याच्या बाजूने आहेत. भारत देखील या दिशेने सतत पुढे जात आहे. अशा परिस्थितीत भारताला आशा आहे की, यासाठी अमेरिकेकडून प्रगत तांत्रिक मदत मिळू शकेल. त्याच वेळी व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर कमला हॅरिसच्या विजयामुळे भारतीय बाजारपेठेत स्थिरता येऊ शकते. याशिवाय कमला हॅरिस विजयी झाल्यास त्यांच्यासोबत चीनबाबत मवाळ वृत्तीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार टिम वॉल्झ यांची अडचण होईल. त्यांचे चीनशीही संबंध आहेत पण कमला हॅरिस इमिग्रेशनच्या मुद्द्यावर भारताला पाठिंबा देऊ शकतात. याचा फायदा भारतीय आयटी क्षेत्राला होणार आहे. अमेरिकेतील लोकशाही सरकार H-1B व्हिसासाठी चांगले काम करत आहेत.

ट्रम्प यांचं चीनबाबत कठोर धोरण

माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या पहिल्या कार्यकाळात त्यांचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगले संबंध होते. ज्या ज्या वेळी ते पंतप्रधान मोदींना भेटले आहेत, त्यांच्या चांगली केमिस्ट्री बघायला मिळाली आहे. ट्रॅम्प यांनी अनेकवेळा जाहीर कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचे कौतुक केलं आहे आणि त्यांना आपले मित्र असल्याचं आपण पाहिलं आहे. अशा परिस्थितीत ट्रम्प अध्यक्ष झाल्यास भारतीय आयटी कंपन्यांसाठी नव्या संधी तयार होण्याची शक्यता आहे. कारण ते व्यापारात चीनबाबत कठोर धोरणाचा पुरस्कार करत आहेत. त्यामुळे तो चीनचा मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जाही संपुष्टात आणू शकतात. ट्रम्प यांच्या विजयाने अमेरिकेचे चीनवरील निर्भरता कमी होईल, ज्याचा फायदा भारताला होईल.

भारताच्या कारभारात हस्तक्षेप नाही

जो बायडेन यांच्यापेक्षा ट्रम्प भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये कमी हस्तक्षेप करतील, असं परराष्ट्र व्यवहार तज्ज्ञांचं मत आहे. त्याचवेळी बायडेन सरकारने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून अटकेवरही भाष्य केले होतं. मात्र भारताने तो आरोप फेटाळून लावला होता. याशिवाय ट्रम्प यांच्या विजयाने रशिया-युक्रेन युद्धही भारताच्या मदतीने थांबवले जाऊ शकते. जर ते जिंकले तर लढाई थांबवू, असे खुद्द ट्रम्प यांनी एका कार्यक्रमात म्हटलं आहे. हे देखील भारताच्या बाजूने असेल. तसेच युक्रेन आणि रशिया हे दोन्ही भारताचे महत्त्वाचे भागीदार देश आहेत. रशिया हा भारताचा मित्र आहे. अशा स्थितीत रशियातील स्थिरता भारतासाठीही महत्त्वाची आहे.

भारतालाही अशा प्रकारे फायदा होऊ शकतो

ट्रम्प अध्यक्ष झाल्यास व्याजदरांसोबतच सोन्याचे भाव आणि अमेरिकन डॉलर जागतिक पातळीवर मजबूत होऊ शकतात, असं बाजारातील तज्ज्ञ म्हण आहे. याशिवाय कच्च्या तेलाच्या किमती कमी होऊ शकतात. तेलाच्या किमती घसरल्याचा थेट फायदा भारताला होणार आहे. मात्र डॉलरच्या मजबूतीमुळे परकीय चलनाच्या साठ्यावर निश्चितच परिणाम होईल. हॅरिस जिंकल्या तर आधीच्या अंदाजानुसार बाजाराची वाटचाल होईल, असं तज्ज्ञांचे म्हणणं आहे. यामुळे व्याजदर कमी होऊ शकतात आणि अमेरिकन डॉलरमध्ये स्थिरता कायम राहिलं.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+