अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना कोरोनाची लागण
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना ऐन निवडणुकीच्या धामधुमीत कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी करीन जीन पियरे यांनी माहिती दिली आहे की, लास वेगासमधील कार्यक्रमादरम्यान बिडेन यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती आणि त्यांना सौम्य लक्षणे जाणवत होती.

कोरोनाची लागण झाल्याचे आढळल्यानंतर बायडेन यांनी राष्ट्रपती पदाची जबाबदारी पार पाडण्यासाठी स्वतःला वेगळे केले आहे. राष्ट्राध्यक्षांचे डॉक्टर केविन कॉनर यांनी बायडेन यांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी केली आणि सांगितले की राष्ट्रपतींना सौम्य लक्षणे दिसली ज्यात नाक वाहणे, खोकला इत्यादींचा समावेश आहे.
जो बायडेन यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करुन दिली माहीती
जो बायडेन यांनी सोशल मीडियावर अमेरिकेतील नागरिकांना उद्देशून पोस्ट लिहिली आहे."माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र मी फार आजारी आहे असं मला वाटत नाही. मला आता बरं वाटतं आहे. अमेरिकेतील नागरिकांच्या शुभेच्छा माझ्यासह आहेत. मला लवकरच बरे वाटेल याची मला खात्री आहे. मी सध्या स्वतःला क्वारंटाइन करतो आहे, मात्र अमेरिकेतल्या नागरिकांसाठी जी कामं करायची आहेत ती मी करत राहणार आहे."
I tested positive for COVID-19 this afternoon, but I am feeling good and thank everyone for the well wishes.
— President Biden (@POTUS) July 17, 2024
I will be isolating as I recover, and during this time I will continue to work to get the job done for the American people.
ओ'कॉनरच्या वैद्यकीय अपडेटमध्ये म्हटले आहे की, बायडेन यांची लक्षणे कायम आहेत. त्याचा सामान्य श्वसन दर 16 आहे, तापमान .8 अंश आहे, पल्स ऑक्सिमीटर रीडिंग 97% आहे. त्याने कोविडसाठी उपचार सुरू केले आहेत आणि डेलावेअरमधील रेहोबोथ येथे त्याच्या घरी स्वत: आइसोलेशनमध्ये राहणार आहेत.












Click it and Unblock the Notifications