Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेत मोठी चूक; रिसॉर्टला तीन विमानांचा घेरा, F-1 ने विरोध, वाचा काय घडलं!

Donald Trump : सर्वशक्तिमान असलेल्या अमेरिका देशाच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेत मोठी चूक झाली आहे. त्यामुळेच एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या वृत्तानुसार, फ्लोरिडामधील मार-ए-लागो रिसॉर्टवरून तीन नागरी विमानांनी प्रतिबंधित हवाई क्षेत्रात प्रवेश केला. जेव्हा विमाने प्रतिबंधित हवाई क्षेत्रात घुसली, तेव्हा हवाई दल ताबडतोब सक्रिय झाले आणि F-16 लढाऊ विमाने पाठवण्यात आली.

कधी व किती वाजता घडली घटना?

एफ-16 लढाऊ विमानांनी अग्निबाण तैनात केले आणि तीन नागरी विमानांना त्या परिसरातून हाकलून लावले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हवाई हद्दीचे उल्लंघन सकाळी 11.05, दुपारी 12.10 आणि दुपारी 12.50 वाजता झाले. तथापि, पाम बीचच्या हवाई क्षेत्रात तीन विमाने का उडली याबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

donald trump

दोन्ही घटना नेमक्या कधी घडल्या?

पाम बीच पोस्टच्या वृत्तानुसार, फेब्रुवारीमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या मार-ए-लागो रिसॉर्ट भेटीदरम्यान, हवाई हद्दीचे तीन उल्लंघन झाले. या दोन्ही घटना 15 आणि 17 फेब्रुवारी रोजी घडल्या. डेली मेलने पुष्टी केली की सहभागी तिन्ही विमाने नागरी होती.

हवाई दलाच्या विमानांनी त्वरीत कारवाई केली

हवाई हद्दीचे वारंवार उल्लंघन केल्यानंतर, उत्तर अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांड (NORAD) ने F-16 लढाऊ विमाने प्रतिबंधित क्षेत्रात पाठवली. त्यानंतर तिन्ही विमानांना हवाई हद्दीतून बाहेर काढण्यास भाग पाडले. या लढाऊ विमानांनी नागरी विमानांना संवेदनशील क्षेत्रापासून दूर नेण्यासाठी फ्लेअर्सचा वापर केला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+