Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

47 वे राष्ट्राध्यक्ष होताच ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रीया! म्हणाले- अमेरिकनांसाठी शेवटपर्यंत लढणार

US Election Results 2024 : अमेरिकन निवडणुकीचा निकाल घोषित झाला असून डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय झाला आहे. आज विजयानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रीया आली आहे. "अखेरच्या श्वासापर्यंत अमेरिकनांसाठी लढत राहील" असे ते म्हणाले.

रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार आणि आता नव्याने अमेरिकेचे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी "हा एक राजकीय विजय आहे जो आपल्या देशाने याआधी कधीही पाहिला नाही असे म्हटले आहे. ट्रम्प यांनी विजयानंतर आपल्या समर्थकांशी आणि देशवासीयांशी संवाद साधला. त्यांनी मतदान करणाऱ्या अमेरिकन नागरीकांचे आभार यावेळी मानले.

US Election Results 2024

शरीरातील अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहील

या विजयासारखे काहीही नाही, 47 वे राष्ट्राध्यक्ष आणि 45 वे अध्यक्ष म्हणून निवडून आणल्याबद्दल मला अमेरिकन जनतेचे आभार मानायचे आहेत. प्रत्येक नागरिक, मी तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी आणि तुमच्या भविष्यासाठी, मी माझ्या शरीरातील प्रत्येक श्वासाने तुमच्यासाठी लढत राहीन, जोपर्यंत आम्ही आमच्या मुलांसाठी पात्र, सुरक्षित आणि समृद्ध अमेरिका देत नाही ज्यासाठी तुम्ही पात्र आहात हे खरोखरच अमेरिकेचा सुवर्णकाळ असेल..." असे ट्रम्प म्हणाले.

..यामुळेच देवाने माझे प्राण वाचवले!

निवडणुकीत विजय निश्चित झाल्यानंतर ट्रम्प यांनी अमेरिकेतील जनतेचे आभार मानले आहेत. ते म्हणाले, "लोकांना जे अशक्य वाटले ते आम्ही केले. देशाच्या सर्व समस्या सोडवणार असल्याचे ट्रम्प म्हणाले. ते म्हणाले की, ते अमेरिकेला पुन्हा एकदा महान बनवेल.

अलास्का, नेवाडा आणि ऍरिझोनामध्ये जिंकणे माझ्यासाठी मोठे आहे. हे अविश्वसनीय आहे. ट्रम्प म्हणाले की, मी अमेरिकन लोकांच्या कुटुंबासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी लढणार आहे. पुढील ४ वर्षे अमेरिकेसाठी महत्त्वाची आहेत. या दिवसासाठी देवाने माझे प्राण वाचवले, असे ट्रम्प म्हणाले.

ट्रम्प म्हणाले की, मी अमेरिकन लोकांच्या कुटुंबासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी लढणार आहे. अमेरिकेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा विजय असल्याचे ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांनी इलॉन मस्कचे कौतुक केले आणि म्हणाले - एलोन एक स्टार आहे. निवडणुकीच्या प्रचारात ते रॉकेटप्रमाणे उडून गेले आहेत.

'माझे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांचे ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन'- PM मोदी

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकन निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. पीएम मोदींनी एक्सवर पोस्ट केली आहे.

PM मोदी म्हणाले, "माझे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या ऐतिहासिक विजयाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन कोेल आहे. तुम्ही तुमच्या मागील कार्यकाळातील यशाचा आधार घेत असताना, भारत-अमेरिका सर्वसमावेशक जागतिक आणि धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी मी आमच्या सहकार्याचे नूतनीकरण करण्यास उत्सुक आहे. आपण सर्वांनी मिळून आपल्या लोकांच्या भल्यासाठी काम करूया आणि जागतिक शांतता, स्थैर्य आणि समृद्धीला प्रोत्साहन देऊ या."

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+