Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अमेरिकेने खेळली 'ही' चाल! पाकिस्तानच्या असिम मुनीरचा मोठा विजय! नेमकं काय झालं? हे जाणून घ्या

US declares Balochistan's BLA a terrorist organization : भारत आणि पाकिस्तान यांचे युद्ध थांबवल्याचा कथित दावा करणाऱ्या ट्रम्प प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे हा निर्णय पाकिस्तानसाठी मोठा फायद्याचा असून या निर्णयाद्वारे अमेरिकेने चाल खेळली आहे.

आधीच डोनाल्ड ट्रम्पने टॅरीफ लादण्याच्या मुद्द्यावरुन भारताची नाराजी ओढावून घेतली आहे. भारतावर ५० टक्के टॅरीफ तर चीनला टॅरीफसाठी ९० दिवसांची मुदत दिली तर खास बाब म्हणजे पाकिस्तानसोबत मोठा तेल करार केला. याधर्तीवर ट्रम्प सरकार पाकचे लांगूलचालन करत असून त्याचाच कित्ता पुन्हा अमेरिकेने गिरवला आहे.

US declares Balochistan s BLA a terrorist organization

Take a Poll

असिम मुनीर यांचा अमेरिका दौऱ्यात मोठा विजय

एकीकडे भारताविरुद्ध गरळ ओकणाऱ्या असिम मुनीरचे पाय चेपण्याचे धोरण अमेरिका राबवत आहे, जरी अमेरिकन विरोधी पक्ष पाकिस्तानचे वाभाडे काढत असले तरीही ट्रम्प प्रशासन मात्र पाकड्यांना कुरवाळत असल्याचे स्पष्ट चित्र दिसते. पाक आर्मी चिफ असिम मुनीर सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत, आणि त्यांनी अमेरिकेकडे केलेल्या विनंतीला यश आले आहे. त्यांनी बलुचिस्तान आर्मीला दहशतवादी घोषित करण्याची मागणी केली होती अमेरिकेने याला सकारात्मक प्रतिसाद देत बलुचिस्तानविरोधात चाल खेळली आहे.

अमेरिकेने बलुच आर्मीला केले दहशतवादी संघटना घोषित

अमेरिकेने बलूच लिबरेशन आर्मी बीएलए आणि त्यांच्या सहयोगी संघटना मजीद बिग्रेडला आतंरराष्ट्रीय दहशतवादी संघटना एफटीओ म्हणून घोषित केले आहे. अमेरिकी विदेश मंत्री मार्को रुबियो यांनी सोमवारी ११ ऑगस्टला रात्री उशीरा ही घोषणा केल्याची माहिती दिली आहे.

मार्को रुबियो काय म्हणाले?

मार्को रुबियो यांनी म्हटले की, बीएलएने २०२४ मध्ये कराची विमानतळाच्या जवळ ग्वादर पोर्ट ऑथोरिटी काॅम्प्लेक्स येथे आत्मघातकी हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. मार्च २०२५ मध्येही जाफर एक्स्प्रेस ट्रेन हायजॅक केल्याची जबाबदारी घेतली होती. यामध्ये ३१ नागरीक आणि सुरक्षारक्षक मारले गेले होते आणि ३०० प्रवाशांना ओलिस ठेवले होते.

आज अमेरिकी विदेश विभागाची ही कारवाई ट्रम्प प्रशासनाची दहशवादाविरोधात लढण्यासंदर्भात प्रतिबद्ध असल्याचे दर्शवित असून दहशतवाद रोखण्यासाठी आमची भूमिका प्रमुख भूमिका पार पाडते असे म्हटले आहे.

बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीच बलुच आर्मी दहशतवादी संघटना घोषित

पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या मागणीनुसार, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने बलुचिस्तानमध्ये स्वातंत्र्यासाठी वर्षानुवर्षे लढणाऱ्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मीवर बंदी घातली त्या दिवशी म्हणजेच ११ ऑगस्ट रोजी बलुचिस्तानी जनता त्यांचा स्वातंत्र्य दिन साजरा करत होते.

बलुचिस्तानकडून अमेरिकेला ऑफर!

बलुचिस्तानने अमेरिकेच्या या कृतीला तीव्र विरोध केला आहे. बलुचिस्तानने म्हटले आहे की त्यांनी नेहमीच अमेरिकेला पाठिंबा दिला आहे. जर ट्रम्प सरकारने त्यांचे स्वातंत्र्य मान्य केले तर ते अमेरिकेचे विश्वासार्ह मित्र असतील असे म्हटले आहे. अमेरिकेने टीआरएफवर बंदी घातल्यानंतर पाकिस्तान अमेरिकेवर बीएलएवर बंदी घालण्यासाठी दबाव आणत होता. पाकिस्तानमध्ये हे मुनीरचे मोठे यश म्हणून सादर केले जात आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+