कमी होईल म्हणता म्हणता, सोन्याचे भाव पोहोचले लाखाच्या घरात; चीन-अमेरिकेने नेमकं काय केलं? वाचा

अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या टॅरिफ वॉरमुळे खळबळ उडाली आहे. जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर, सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. शुक्रवारी (११ एप्रिल) सोन्याने एक नवीन विक्रमी उच्चांक गाठला. आंतरराष्ट्रीय बाजारात पहिल्यांदाच त्याची किंमत प्रति औंस $ ३,२०० च्या पुढे गेली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा वायदा भावही प्रति १० ग्रॅम ९३,७३६ रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला.

gold prices increased

गुंतवणुकदारांना केले मालामाल

सोने गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला सोन्याचा भाव प्रति औंस $२६५० होता. सध्या ते $३२०० च्या वर व्यापार करत आहे. गेल्या वर्षी २०२४ मध्ये सोन्याने २८ टक्के परतावा दिला होता. १ एप्रिल रोजी एमसीएक्सवर सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ९१,४०० रुपये होता. ३ एप्रिल रोजी ते प्रति १० ग्रॅम ९१,४२३ रुपये आणि १० एप्रिल रोजी प्रति १० ग्रॅम ९२,४०० रुपये होते.

तज्ञांचे मत काय आहे?

येत्या सहा महिन्यांत सोन्याचा भावाच चढउतार राहील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र येत्या चार-पाच वर्षांत सोन्याचे भाव एक ते सव्वा लाख रुपये तोळ्यापर्यंत जाऊ शकतात, अशी शक्यताही वर्तवली जात आहे. सोन्याची गुंतवणुक असुरक्षित मानली जात असली तरी, सोन्याच्या किंमतीत येत्या काही वर्षांत उच्चांकी वाढ होईल, असेही काहींचे मत आहे.

आज किती वाढले सोने?

सोन्याचा भाव सकाळी १०.३० वाजता ९३,२६६ रुपयांवर व्यवहार करत होता. जो १,२३३ रुपयांनी म्हणजेच १.३४ टक्क्यांनी वाढला. सुरुवातीच्या व्यवहारात तो ९३,७३६ रुपयांवर पोहोचला. चांदीचा भावही ७६३ रुपयांच्या वाढीसह ९२,३५८ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत होता. आंतरराष्ट्रीय सोन्याच्या किमती १% पेक्षा जास्त वाढून ३,२१७.४३ डॉलर प्रति औंस झाल्या. या आठवड्यात सोन्याच्या किमतीत ५% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. अमेरिकेतील सोन्याचा वायदा १.५% वाढून $३,२२६.५० वर पोहोचला. ऑक्टोबर २०२२ पासून त्यात ९० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+