Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

विमान कोसळले; आग अन् स्फोटाने हाहाकार! 'एवढ्या' लोकांचा मृत्यू काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO आला समोर

UPS Cargo Plane Crashes : अमेरिकेतील केंटकी राज्यात एक अत्यंत भीषण आणि चिंताजनक घटना घडली आहे. लुईव्हिल येथील मुहम्मद अली आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करत असताना, UPS चे एक मोठे विमान कॅश आणि स्फोट झाला, हे विमान लगेचच जमीनदोस्त झाले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात आगीचे मोठे तांडव पाहायला मिळाले. या अपघाताचा व्हिडिओ काळजाचा थरकाप उडवणारा आहे.

UPS Cargo Plane Crashes

अपघातात 'एवढे' लोक ठार

या अपघातात आतापर्यंत किमान ३ लोकांचा मृत्यू झाला असून ११ जण जखमी झाले आहेत. मात्र, केंटकीचे गव्हर्नर अँडी बेशर (Andy Beshear) यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आकडा अजून वाढण्याची भीती आहे. विमान कोसळल्यामुळे निर्माण झालेली आग आणि स्फोटक सामग्रीमुळे संपूर्ण परिसर अतिशय धोकादायक बनला आहे.

अपघाताची ताजी अपडेट्स

UPS चे McDonnell Douglas MD-11 हे मालवाहू विमान स्थानिक वेळेनुसार मंगळवारी सायंकाळी ५:१५ च्या सुमारास होनोलूलूसाठी उड्डाण करत होते, तेव्हा हा अपघात झाला.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, विमान हवेत थोडे वर उचलण्यापूर्वीच त्याच्या डाव्या पंखाला आग लागली होती. त्यानंतर विमान कोसळले आणि मोठा स्फोट होऊन प्रचंड आग लागली.

विमान धावपट्टीजवळच्या दोन स्थानिक व्यवसायाच्या इमारतींना आणि धडकले, ज्यामुळे इमारतींच्या छताचे तुकडे झाले.

वनइंडिया इंग्रजीच्या वृत्तानुसार, गव्हर्नर बेशर यांनी सांगितले की, विमानात २,५०,००० पौंडांहून अधिक जेट इंधन होते. इंधन आणि इतर स्फोटक सामग्रीमुळे परिस्थिती अजूनही धोकादायक आहे, त्यामुळे बचाव दलाच्या कर्मचाऱ्यांनाही आगीपासून वाचण्यासाठी जागा घ्यावी लागली.

'आश्रय घेण्याचे' आदेश जारी

विमान कोसळल्यानंतर झालेल्या मोठ्या धुरामुळे, विमानतळाच्या उत्तरेकडील ओहायो नदीपर्यंतच्या संपूर्ण भागातील रहिवाशांना 'घरातच आश्रय घ्या' असा आदेश देण्यात आला आहे. नागरिकांना घरातील एअर-इनटेक सिस्टीम बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अपघात कशामुळे? घटनेचा तपास सुरु

लुईव्हिल येथे UPS चे जगातील सर्वात मोठे पॅकेज हाताळणी केंद्र 'वर्ल्डपोर्ट'आहे. या हबमध्ये हजारो कर्मचारी काम करतात आणि दररोज ३०० उड्डाणे येथून होतात. विमानतळ तात्पुरता बंद करण्यात आल्याने UPS च्या जागतिक लॉजिस्टिक्सवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अपघाताचे नेमके कारण काय होते, याचा तपास एफएए आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड या संस्थांनी सुरू केला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+