रशियावर 9/11 सारखा भीषण हल्ला; पहा थरारक Video

गेल्या अनेक महिन्यांपासून रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. आता युक्रेनने रशियावर एक मोठा हल्ला केल्याची बातमी समोर आली आहे. युक्रेनकडून रशियन शहरावर सतत बॉम्ब हल्ले सुरु आहेत. हल्ल्यांमध्ये घातक क्षेपणास्त्रांचाही वापर होताना दिसत आहे. शनिवारी युक्रेनने रशियावर 9/11 सारखा भीषण हल्ला केला.

Ukraine-Russia war

सहा इमारतींवर ड्रोनने हल्ला

युक्रेनच्या सैन्याने रशियाच्या कजानमधील 6 इमारतींवर ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यानंतर कजानमध्ये एकच गोंधळ सुरु झाला. हल्ल्यानंतर इमारती रिकाम्या करण्यात आल्या. शाळा बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. हल्ल्यानंतर बचाव कार्य सुरु असताना आणखी एक हल्ला झाला. कजान एअरपोर्ट सुद्धा बंद करण्यात आला आहे. युक्रेनच्या सैन्याने 8 ड्रोन्सनी 6 इमारतींना लक्ष्य केल्याचे प्रसार माध्यमांचे म्हणणे आहे. सतत सुरु असलेल्या या हल्ल्यांमुळे रशियन नागरिकांना अंडरग्राउंड शेल्टर्समध्ये आसरा घ्यावा लागला आहे. कजान शहरच्या महापौरांनी नागरिकांना सुरक्षित स्थळी रहाण्यास सांगितलं आहे.

एकाच वेळी सहा हल्ले

ड्रोन्सनी एकाच वेळी कामलेव एवेन्यू, क्लारा जेटकिन स्ट्रीट, युकोजिंस्काया, खादी तक्ताश आणि क्रास्नाया पॉजित्सिया या इमारतींना धडक दिली. दोन अन्य ड्रोन्सनी ऑरेनबर्गस्की ट्रॅक्ट स्ट्रीटवरील घराला लक्ष्य बनवले. या हल्ल्यात किती मृत्यू झाले किंवा किती जखमी झाले हे मात्र आद्याप समजले नाही. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हल्ला झालेल्या ठिकाणाहून सर्व लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे.

सामुहिक कार्यक्रम रद्द

या हल्ल्यानंतर रशिया सरकारने पुढच्या दोन दिवसांसाठी राज्यातील सर्व सामूहिक कार्यक्रम रद्द केल्याची घोषणा केली आहे. रशिया युक्रेनच्या हल्ला करण्याच्या क्षमतेला एक सामान्य घटना मानायला तयार नाही. युक्रेन भविष्यातही असे हल्ले करणार असल्याने रशियाचे म्हणणे आहे. त्यामुळे दोन दिवस सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. दुसरीकडे रशियाने या हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्याचे ठरवले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+