'चाणक्यनिती' की 'कुटनिती'? रशिया- युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी डोनाल्ड ट्रम्पचा 'तुकडे-तुकडे' प्लॅन
सध्या रशिया व युक्रेन युद्ध सुरु आहे. ते थांबविण्यासाठी आत्तापर्यंत वेगळेगळे प्रयत्न झाले. आता युक्रेनचे विभाजन करण्याचा प्लॅन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या राजदूताकरवी मांडला आहे. माॅस्कोमधील ट्रम्प यांचे विशेष राजदूत स्टीव्ह केलाॅग यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांची भेट घेत हा प्रस्ताव दिला. यामुळे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्सी यांच्या गटात घबराट पसरली आहे. दुसऱ्या महायुद्धात बर्लिनचे जसे विभाजन केले होते, तसेच आता युक्रेनचे विभाजन करण्याचा हा प्रस्ताव आहे.

अमेरिकेचे विशेष दूत काय म्हणाले?
केलॉग म्हणाले की, नीपरच्या पश्चिमेला अँग्लो-फ्रेंच नेतृत्वाखालील सैन्य व्लादिमीर पुतिन यांच्या राजवटीला कुठलेही नुकसान पोहोचवणार नाही. युद्धबंदी लागू करण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक सैन्यांना सामावून घेण्याइतपत युक्रेन मोठा आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर बर्लिनमध्ये जे घडले तसेच युक्रेनमध्येही केले जाऊ शकते.
रशिया-युक्रेन सीमा कोणती?
यूके-फ्रेंच सैन्य डनिप्रो नदीच्या पश्चिमेला असेल. ही नदीच सिमाक्षेत्र असेल. अमेरिका या भागात जमिनीवर कोणतेही सैन्य तैनात करणार नाही. सध्याच्या सीमारेषेवर लागू करण्यात येणारा १८ मैल रुंद निःशस्त्रीकरण झोन खूप सहजपणे नियंत्रित केला जाऊ शकतो. गेल्या महिन्यात पुतिन यांचे विश्वासू रशियन परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी आग्रह धरला की क्रेमलिन कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही नाटो राष्ट्राकडून शांतीसेना दल स्वीकारणार नाही.
४ तासांपेक्षा जास्त चालली बैठक
ट्रम्पचे दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी क्रेमलिनमध्ये राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी सुमारे ४ तास चर्चा केली. रशिया-युक्रेन युद्धाच्या मुद्द्यावर पुतिन यांच्यासोबत कोणत्याही अमेरिकन अधिकाऱ्याची ही सर्वात जास्त काळ झालेली बैठक होती. बैठकीनंतर क्रेमलिनने सांगितले. रशियाच्या सरकारी वृत्तसंस्था TASS नुसार पुतिन यांचे गुंतवणूक दूत किरील दिमित्रीव्ह यांनी ही चर्चा फलदायी आणि अर्थपूर्ण असल्याचे वर्णन केले.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications